स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित! - Congress leader shocked by Modi Pawar meeting | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

स्वबळाची भाषा बोलणारे काँग्रेस नेते मोदी-पवार भेटीमुळे अचंबित!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

शरद पवार यांनी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन राजकीय खळबळ उडवून दिली.

मुंबई : काँग्रेस नेत्यांच्या, प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रोजच्या भूमिका, विधाने आणि इशाऱ्यांमुळे गेल्या काही दिवस काँग्रेसच्या गोटात उत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना बोलावून काँग्रेसच्या मनात नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी केला. त्यानंतर मात्र, पवार यांनी लगेचच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. त्याआधी फडणवीस हे पवार यांच्यात चर्चा झाली आणि दिल्लीत पंतप्रधान मोदी, पवार Narendra Modi यांच्यात जवळपास तासभराचे गुफ्तगु झाल्याची चर्चा आहे. Congress leader shocked by Narendra Modi Sharad Pawar meeting

पक्षवाढीच्या भूमिकेतून मित्रपक्षांवर कुरघोडी करून काँग्रेसने राजकीय माहोल तयार केला खरा; पण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन राजकीय खळबळ उडवून दिली. परिणामी, महाविकास आघाडीतील मित्रांच्या माहोल, खळबळीने ते एकमेकांना आव्हान देत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या भूमिकांची चर्चा वाढतानाच पवार यांच्या भेटीगाठींच्या खेळीने काँग्रेस 'बॅकफूट'वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या भेटीगाठी पाहता नव्या राजकीय समीकरण जुळली जातील, याचा अंदाज बांधला जात आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता, मोदी, पवार आणि पवार आणि अन्य भाजप नेत्यांच्या भेटींचा कॉंग्रेस नेत्यांनी अद्याप कोणताही अर्थ जाहीर केला नाही. एकूणच पवार यांच्या पवित्र्यापुढे काँग्रेस थोडी का होईना पण झुकेल, असे सांगण्यात आले. म्हणजे, गेल्या काही दिवसांतील पक्षविस्ताराची भाषा, त्यातून पुढे आलेले स्वबळ, मित्रपक्षांवर ठपका ठेवताना केलेला पाळत ठेवण्याचा आरोप, यापासून काँग्रेस बॅकफूटवर येईल, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. 

सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात काँग्रेस वाढण्याचे संकेत दाखविले जात असले तरी शिवसेना, राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहावेच लागेल. या दोन पक्षांना समजून घ्यावे. ज्यामुळे विरोधकांना नवे कोलीत मिळणार नाही. असे सूचक विधानही काँग्रेसच्या या नेत्याने केले आणि काँग्रेसला भूमिका घेताना आघाडीचा विचार करावा लागेल, हेही या नेत्याने स्पष्ट केले.

`राज्यातील भाजप नेत्यांची तोंडे बंद करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी लढविली ही शक्कल!`
 मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातून ठाकरे सरकार आणि भाजप नेत्यांमधील राजकीय वैर वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत मराठा,ओबीसी आरक्षण, मंत्री, आमदारांच्या चौकशा, १२ आमदारांच्या निलंबनावरून सरकार विरोधक आमने-सामने येत आहेत. सरकारविरोधात लोकांत जाऊन आंदोलने करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाही. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख