राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह ट्विट करणारे भाजपचे पदाधिकारी गावडे पोलिसांच्या ताब्यात - BJP leader Pradip Gawde in Mumbai police custody | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह ट्विट करणारे भाजपचे पदाधिकारी गावडे पोलिसांच्या ताब्यात

उमेश घोंगडे 
शनिवार, 22 मे 2021

शरद पवार ,रोहित पवार  यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप गावडे त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी आज सकाळी पुण्यातील त्यांच्या घरून ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar व आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. BJP leader Pradip Gawde in Mumbai police custody

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर गावडे यांनी हे ट्विट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत समाज माध्यमात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 54 जणांविरोधात गावडे यांनी पुणे सायबर पोलिसांकडे गेल्या आठवड्यात तक्रार दिली होती. या पार्श्वभूमीवर आज गावडे यांना ताब्यात घेऊन मुंबईला नेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोनियांचे मोदींना पत्र..म्यूकरमायकोसिसच्या अपुऱ्या ओैषधांबाबत व्यक्त केली चिंता..

"आज सकाळी मुंबई पोलिस पुण्यातील माझ्या घरी आले. दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती त्यांनी दिली व सोबत मुंबईतील येण्याची विनंती केली. मी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र, पोलिसांची कारवाई पूर्णपणे एकतर्फी आहे. कारवाई करण्यायाआधी मला कोणतीही नोटीस दिलेली नाही," असे, गावडे यांनी "सरकारनामा"शी  बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वीच प्रदीप गावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या ५४ जणांविरोधात तक्रार केली होती. पण त्या तक्रारीवर पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. पण गावडे यांना मात्र ताब्यात घेतले आहे.

ॲड. प्रदिप गावडे यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे गावडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असल्याची चर्चा आहे.  मोदींवर खालच्या पातळीची टीका करण्यासाठी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसताना गावडे यांना मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख