सोनियांचे मोदींना पत्र..म्यूकरमायकोसिसच्या अपुऱ्या ओैषधांबाबत व्यक्त केली चिंता.. - congress sonia gandhi wrote to pm modi requesting take action on | Politics Marathi News - Sarkarnama

सोनियांचे मोदींना पत्र..म्यूकरमायकोसिसच्या अपुऱ्या ओैषधांबाबत व्यक्त केली चिंता..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

आय़ुष्यमान भारत योजनेमध्ये  म्यूकरमायकोसिसच्या उपचाराचा समावेश करा

नवी दिल्ली : कॅाग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. देशातील  म्यूकर मायकोसिस ब्लॅक फंगसच्या रुग्णांच्या संख्या वाढत आहे. त्याच्या ओैषधांचा पुरवठा कमी असल्याची चिंता सोनिया गांधी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. congress sonia gandhi wrote to pm modi requesting take action on 

देशात म्यूकर मायकोसिस ब्लैक फंगसच्या रूग्णांची संख्या वाढत असून याच्यापासून बचावासाठी पुरेशा ओैषधांचा साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. आय़ुष्यमान भारत सारख्या आरोग्याच्या योजनांमध्ये  म्यूकर मायकोसिस च्या उपचाराचा समावेश करावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

 पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा बळी गेले आहेत. सर्वाधिक ११ मृत्यू पुणे शहर हद्दीत झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ३५३ जणांना म्युकर मायकोसिसची लागण झाली आहे.  उपचारानंतर २१२ रुग्ण म्युकर मायकोसिसमधून मुक्त झाले आहेत. सध्या ११५ जणांवर उपचार सुरु आहे.  

म्युकरमायकोसिसमुळे गमावला डोळा, उपचारासाठी गाव झाला गोळा
 
शिर्डी : जिवावर बेतले ते डोळ्यावर निभावले. कोविडचे अपत्य असलेल्या म्युकरमायसोसिसने आपले क्रौर्य दाखविले. त्याच्या विरोधातील लढाईत पिंप्री निर्मळ  येथील प्रेमराज निर्मळ (वय 47) यांना आपला एक डोळा गमवावा लागला.  जेमतेम आर्थिक परिस्थिती असल्याने गाव त्यांच्या पाठीशी उभा राहिला. सर्वांच्या मदतीतून उपचारासाठी तब्बल सत्तावीस लाख रुपये खर्च करण्यात आले. आठवडाभरात ते ही लढाई जिंकतील व गावी परततील, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. प्रेमराज यांची घरची तीन एकर जमीन, दरमहा दहा हजार रुपये पगाराची खासगी नोकरी, बॅंकेत डाळिंबाच्या शेतीतून मिळालेली सात-आठ लाख रुपयांची शिल्लक, असा आनंदात प्रपंच सुरू होता. कोविड बाधेचे निमित्त झाले. त्याचे रूपांतर म्युकरमायसोसिसमध्ये झाले. या दीड महिन्याच्या लढाईत पाण्यासारखा पैसा खर्च झाला. एक डोळा गमवावा लागला. गावचे सरपंच डॉ. मधुकर निर्मळ यांनी एक ते दीड लाखाची मदत केली. मिलाफ या सोशल मीडियावरील साइटच्या माध्यमातून अडीच लाख रुपये मिळाले. उर्वरित पैसे नातेवाइकांनी धावपळ करून उभे केले. जिवावर बेतले, ते डोळ्यावर निभावले. दरम्यान, या प्रकाराची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख