भूपेंद्र पटेल यांनी घेतली शपथ ; भाजपशासित चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

शपथ घेण्यापूर्वी भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथील स्वामीनारायण मंदिरात गाईची पूजा केली.
Sarkarnama - 2021-09-13T155343.398.jpg
Sarkarnama - 2021-09-13T155343.398.jpg

गांधीनगर : पहिल्यांदा आमदार झालेले भूपेंद्र पटेल Bhupendra Patel यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते गुजरातचे  १७ वे मुख्यमंत्री आहेत. राजभवन येथे झालेल्या समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांनी त्यांना शपथ दिली. भूपेंद्र पटेल यांनी गुजरातीमध्ये शपथ घेतली.

यावेळी गृहमंत्री अमित शाह  Amit Shah यांच्यासह भाजप शासित चार राज्याचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. कर्नाटकचे बसवराज बोम्मई, मध्यप्रदेशचे शिवराज चैाहान, गोव्याचे प्रमोद सावंत, हरियाणाचे मनोहरलाल खट्टर हे चार मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.  मंत्रीमंडळात कोणताही बदल केलेला नाही. 

याशिवाय केंद्रिय मंत्री मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रूपाला, भूपेंद्र यादव, नरेंद्र तोमर, दर्शना बेन जरदोश यांच्यासह अन्य केंद्रिय मंत्री, आमदार, खासदार, विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितिन पटेल या समारंभास उपस्थित होते. शपथ घेण्यापूर्वी भुपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथील स्वामीनारायण मंदिरात गाईची पूजा केली.  

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या बड्या नेत्यांना डावलून भाजपनं पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली आहे. विधिमंडळ कामकाजाचा जेमतेम चार वर्षांचा अनुभव असलेले पटेल मुख्यमंत्री झाले आहेत.  विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने शनिवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. रुपानी यांचा वारसदार कोण, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अनेकांच्या नावांवर चर्चा सुरू होती. पण अचानक भूपेंद्र पटेल यांचं नाव समोर आलं अन् त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. पटेल हे गुजरातमधील मोठं नाव असलं तरी राज्याच्या कामकाजात त्यांचा फारसा अनुभव नाही. 

पटेल हे 59 वर्षांचे असून घाटलोदिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. पण वयाचं कारण देत आनंदीबेन पटले यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्याजागी भूपेंद्र पटेल यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा तब्बल 1 लाख 17 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. 

पटेल हे अहमदाबाद नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. 1999 ते 2000 या कालावधीत मेमनागागर नगरपालिकेचे अध्यक्ष, 2008 ते 10 मध्ये अहमदाबाद महापालिकेच्या शाळा मंडळाचे उपाध्यक्ष तर 2010 ते 2015 या कालावधीत नगरसेवक होते. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. 

आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून भूपेंद्र पटले यांची ओळख आहे. तसेच ते पाटीदार समाजाचे असल्यानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशन या पाटीदार संस्थांचे ते विश्वस्तही आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com