भातखळकरांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र..मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी कामात गैरव्यवहार... - Bhatkhalkar letter to Chief Minister Thackeray Manorama MLA residence reconstruction work  | Politics Marathi News - Sarkarnama

भातखळकरांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र..मनोरा आमदार निवास पुनर्बांधणी कामात गैरव्यवहार...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी कामात गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीबाबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर Atul Bhatkhalkar यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना पत्र लिहिले आहे. यात गैरव्यवहार असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. या प्रकरणाची चैाकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. MLA Bhatkhalkar letter to Chief Minister Thackeray Manorama MLA residence reconstruction work 

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी केंद्र सरकारची संस्था असलेल्या नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन सोबत 600 कोटींचा करार केला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तो करार रद्द करण्यात आला. नवीन कंत्राटात केवळ वीजेच्या कामासाठी तब्बल 250 कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. या कामाच्या वास्तुविशारदांनी वाढीव 300 कोटी रुपयांचा खर्च हा इमारतीच्या फिनिशिंगवर होणार असल्याचे सांगितले आहे. 600 कोटी रुपयांच्या कामावर 300 कोटी रुपयांची फिनिशिंग केली जाणार असल्याचे सांगणे म्हणजे यात नक्कीच मोठा गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.

राहुल गांधी मोदींना म्हणाले,  "नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको..."

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचा खर्च 2 वर्षाच्या कालावधीत तब्बल 66 टक्क्यांनी वाढला असल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे कंत्राट तात्काळ रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा या संपूर्ण प्रकरणाची मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.

सेंट्रल विस्टा इमारतीच्या बांधकामावरून टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सरकारचा 'कंत्राट'नामा व वायफळ खर्च दिसत नाही काय ? महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करण्यासाठी पैसे नसताना एवढ्या वाढीव दराने काढण्यात आलेले कंत्राट मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द करावे, अन्यथा या विरोधात भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख