राहुल गांधी मोदींना म्हणाले,  "नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको..." - Congress leader Rahul Gandhi's criticism of Prime Minister Narendra Modi from his new home | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी मोदींना म्हणाले,  "नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको..."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

मोदींच्या निवासस्थानावरुन राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार अतिशय वेगाने भव्यदिव्य नवीन संसद भवन 'सेंट्रल व्हिस्टा'चे (central vista) बांधकाम  करीत आहे. त्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्या निवासस्थानाचे बांधकाम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तर संसद भवन नोव्हेंबर 2022 मध्ये सज्ज होईल. सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा आहे. Congress leader Rahul Gandhi's criticism of Prime Minister Narendra Modi from his new home

मोदींच्या निवासस्थानावरुन कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी टि्वट करीत निशाणा साधला आहे. "सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांच्या जीवनाचा प्रश्न असताना नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको," असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारला लगावला आहे.  

सेंट्रल व्हिस्टा या प्रकल्पामध्ये मुख्य संसद भवनाच्या वास्तूबरोबरच पंतप्रधानांचे निवासस्थान आणि मंत्रालयांच्या अन्य इमारतीही नव्याने उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे भूमिपूजन मागील वर्षी 10 डिसेंबरला झाले आहे. हा तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प आहे. मोदींचा हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पंतप्रधान मोदींनी हा प्रकल्प अतिशय प्रतिष्ठेचा केला आहे.

दरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यूदरात वाढ होत आहे. संशोधकांच्या मतानुसार देशात तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कॅाग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राहुल गांधींनी मोदींना काही सूचना दिल्या आहेत. 

ममतादीदींची निवडणूक आयोगाला चपराक..सत्ता पुन्हा हाती येताच IAS,IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या.
 
मोदी यांना पत्र लिहून राहुल गांधी यांनी कोरोना म्यूटेशन ट्रॅक करण्याचा सल्ला दिला आहे. सर्व प्रकारच्या म्यूटेशनवर लवकरात लवकर व्हॅक्सिन चाचणी करावी असंही राहुल गांधी मोदींना सांगितलं आहे. लसीकरण वेगाने करण्याची आग्रही मागणीही केली आहे.  हे पत्र काँग्रेसनं  ट्विटरवरुन पोस्ट केलं आहे. केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी स्पष्ट धोरण नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. देशावरील संकट पाहता भारतीय नागरिकांना प्राथमिकता देणं गरजेचं आहे. देशातील नागरिकांना या समस्येतून काढण्यासाठी जे शक्य होईल ते करा, अशी विनंती मोदींना राहुल गांधींना केली आहे.  

राहुल गांधी आपल्या पत्रात म्हणतात की, मोदींजी मी तुम्हाला पुन्हा एकदा पत्र लिहित आहे. कारण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जेव्हा कोरोना पसरत होता तेव्हा कोरोनावर विजय मिळवल्याच्या आवेशात आपण होता. केंद्राच्या अपयशामुळेच आता देशात लॉकडाऊनची स्थिती उद्भवली आहे.   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख