मालकाला खूश करण्यासाठी भास्कर जाधव असं करतात!

भास्कर जाधव यांनी यापूर्वीही विधानसभेत गैरवर्तन केलं आहे.
4Sarkarnama_20Banner_20_289_29_26.jpg
4Sarkarnama_20Banner_20_289_29_26.jpg

मुंबई :  शिवसेनचे आमदार  भास्कर जाधव bhaskar jadhav यांनी काल चिपळूणमध्ये chiplun मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडणाऱ्या महिलेला अरेरावीची भाषा वापरली. यावरुन विरोधक आणि सोशल मीडियातून जाधव यांच्यावर टीका होत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार ashish shelar यांनी आज भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.   

आशिष शेलार म्हणाले, ''भास्कर जाधव यांनी यापूर्वीही विधानसभेत गैरवर्तन केलं आहे. काल त्यांनी पुरग्रस्तांसोबत गैरवर्तन केलं आहे. ते आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असं करीत असतात.'' शेलार पत्रकारांशी बोलत होते. 

शेलार म्हणाले की, राज कुंद्राच्या व्हिडिओबाबत आम्ही वारंवार अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले. पण तत्कालीन गृहमंञ्यांनी आम्हाला हास्यास्पद उत्तरं दिली. जणू काय महाराष्ट्र सरकारचा त्याला राजाश्रय होता का असे दिसते. राज कुंद्रा प्रमाणे अनेक जण यात गुंतलेलं आहे. केंद्रीय तपास यंञणांकडून या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे. काही तरुण तरुणींची यात पिळवणूक होते का ? याचा शोध घेणं गरजेचे आहे.  नाईट लाईफच्या पुरस्कर्त्यांनी आता याकडे लक्ष द्यायला हवे. 

एका संस्थेच्या अहवालानुसार चाईल्ड पोर्नग्राफीच्या क्लिप वायरल केल्या आहेत. २०१७ ते २०१९ काळात ४५ टक्के पोस्कोचे गुन्हे दाखल झाले आहेत. अनेक अश्लील अँपचे रँकेट आहे. जे एका ड्रग्ज तस्करांप्रमाणे कार्यरत आहे. यामुळे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे, असे शेलार म्हणाले. 

सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी अन् फितुरी केली!
 मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती, मुंबईचा अर्थसंकल्प, मिठीनदीवरील अतिक्रमण या विषयावरुन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  ''आज २६ जुलै याच दिवशी मुंबईत अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. हा दिवस दुदैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा  दिवस आहे. कित्येक वर्ष उलटूनही मुंबईतील परिस्थिती काही बदलली नाही,'' अशी टिका शेलार यांनी राज्य सरकारवर केली आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com