सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी अन् फितुरी केली!

मग हे पैसे गेले कुठे याचे उत्तर शिवसेनेला द्यावं लागेल.
0Ashish_20Shelar_2017.jpeg
0Ashish_20Shelar_2017.jpeg

मुंबई : राज्यातील पूर, मुंबईचा अर्थसंकल्प, मिठीनदीवरील अतिक्रमण या विषयावरुन भाजपचे नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी शिवसेनेवर  Shiv Sena  निशाणा साधला आहे.  ''आज २६ जुलै याच दिवशी मुंबईत अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. हा दिवस दुदैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा  दिवस आहे. कित्येक वर्ष उलटूनही मुंबईतील परिस्थिती काही बदलली नाही,'' अशी टिका शेलार यांनी राज्य सरकारवर केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. BJP leader Ashish Shelar targets Shiv Sena

आशिष शेलार म्हणाले की,  चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कोट्यावधी रुपयांचे प्रोजेक्टच्या नावाखाली १६ वर्षात ३ लाख २० हजार कोटीचा अर्थसंकल्प खर्च मुंबईकरांसाठी केला, मात्र खर्च करून चित्र तेच आहे. मग हे पैसे गेले कुठे याचे उत्तर शिवसेनेला द्यावं लागेल. चितळे कमिठी, आयआयटीच्या अहवालाचं काय झालं. हे पैसे पाण्यात गेले आणि मुंबई करांचे जीव टांगणीला लागले आहेत. आयआयटी पवईचा अहवाल पाण्यात बहुदा भिजून गेला.   

''इतके वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. जनतेच्या पैशांचा हिशोब शिवसेनेकडे मागण्याचे काम भाजप करेल,'' असे शेलार म्हणाले. ''मुंबईतील पाणलोट क्षेत्र मोजलयं का ? मिठीनदीवरील अतिक्रमण हटवलं का, पंपिंग स्टेशनचं काय झालं, असा सवाल शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे. ''दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर,'' अशी टिका शेलार यांनी यावेळी केली. 

अतिवृष्टीत निराधार झालेल्या आजीला राज्यमंत्र्यांनी दिला आधार!
लातूर : आठवड्याभरात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमध्ये औसा तालुक्यातल्या गुळखेडा गावातील सरूबाईं टिके यांचे घर सुद्धा यात कोलमडून गेलं. सरुबाई टीके यांच्या घराची दुरावस्था झाली, ही माहिती मिळताच राज्याचे शालेय राज्यमंत्री बच्चू कडू Bachubu Kaduयांनी सरुबाई टीके Sarubai यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. आज त्यांनी घर बांधण्यासाठी पायाभरणीचा प्रारंभ केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com