API सुनील माने निलंबित : सचिन वाझेला साथ देणाऱ्यांवर कायद्याची कुऱ्हाड

वाझेला साथ देणारा दुसरा अधिकारी अटकेत...
API Sunil Mane
API Sunil Mane

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवसास्थानाजवळ सापडलेली स्फोटके तसेच, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सुनील माने यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणात त्यांचे नाव आल्यानंतर त्यांची गुन्हे शाखेतून सशस्त्र(एलए) विभागात बदली करण्यात आली होती. आता या विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

या आधी वाझेसोबत असलेला रियाझ काझी या एपीआयला देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यानेही पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेला मदत होती. निलंबित पोलिस विनायक शिंदेही एनआयएच्या कोठडीत आहे. त्यामुळे वाझेसोबत जे होते ते सर्वजण आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

काही तांत्रिक पुरावे तसेच एटीएसने केलेल्या चौकशीत सुनील माने यांचा मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना एनआयएने अटक केली होती. एनआयएने त्याबाबतचा अहवालही राज्य गृहमंत्रालयाला पाठवला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणी माने यांना २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सुनिल माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे माजी पोलीस निरीक्षक होते. त्यादरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला त्यांनी मदत केली होती. विशेषत: मनसुख हिरेनला वाहनातून रेतीबंदरपर्यंत नेताना त्या वाहनाला सुनील माने यांनी सुरक्षा पुरविल्याचा संशय एनआयएला आहे. त्यानुसार, एनआयएच्या पथकाने माने यांना रेती बंदर येथे नेऊन त्याठिकाणी शोध मोहिम राबवली.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
बुकी नरेश गोर याने उपलब्ध केलेल्या सीमकार्डपैकी दोन सीमकार्ड आणि मोबाईल सुनिल माने वापरत असल्याचे समोर आले आहे. तसेच, सचिन वाझेला अटक होताच याप्रकरणातील अनेक पुरावे माने यांनी नष्ट केल्याचा संशय एनआयएला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com