वाझे नव्हे, सुनील माने यांनीच मनसुखला हत्येच्या दिवशी फोन केला - Not Sachin Waje, Sunil Mane called Mansukh on the day of the murder | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

वाझे नव्हे, सुनील माने यांनीच मनसुखला हत्येच्या दिवशी फोन केला

सुरज सावंत
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

माने पहिल्या दिवसापासून सहकार्य करीत असताना पहाटे त्यांना अटक करण्यात आली. हे कायद्याने चुकीचे आहे. त्यांना तातडीने जामीन मिळावा. 48 तासात चाैकशीनंतर अटक करणे चुकीचे आहे.

मुंबई ः मनसुखला हत्येच्या दिवशी फोन करणारा सचिन वाझे नसून, पोलिस निरीक्षक सुनील माने यानेच फोन करून मनसुखला हत्येच्या दिवशी बोलावले, असे स्पष्ट झाले आहे.

सुनील माने यांना आज दुपारी स्पेशल कोर्टात आणण्यात आले. सुनील माने यांना न्यायालयाने 28 पर्यंत कोठडी सुनावली आहे. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलिस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने माने यांना बेड्या ठोकल्या. माने हे कांदिवली क्राईम ब्रॅंचचे माजी पोलिस निरीक्षक आहेत. आज झालेल्या सुनावनीत काही बाबी उघड झाल्या आहेत. 

माने पहिल्या दिवसापासून सहकार्य करीत असताना पहाटे त्यांना अटक करण्यात आली. हे कायद्याने चुकीचे आहे. त्यांना तातडीने जामीन मिळावा. 48 तासात चाैकशीनंतर अटक करणे चुकीचे आहे. एनआयईकडे कुठलेही पुरावे नाहीत. मानेचा या गुन्ह्यात रोलही नाही. फक्त तांत्रिक पुराव्याच्या आधारावर ही अटक करण्यात आली असल्याचा युक्तीवाद माने यांच्या वकिलाने केला.

तसेच मानेला मानसिक त्रास देऊ नये. दररोज मेडिकल होईल का, आणि त्याची एक काॅपी आम्हाला द्यावी, रिमांड काॅपी तरी देण्यात यावी, अशी मागणी मानेच्या वकिलांनी केली.

दरम्यान, मनसुखच्या हत्येच्या गुन्ह्यात मानेचा स्पष्ट सहभाग असल्याचे एटीएस तपासात समोर आले आहे. तसेच काही तांत्रिक पुरावेही माने विरोधात आढळून आल्यानेच ही अटकेची कारवाई केली असल्याचे एनआयए कडून सांगण्यात आले.

दरम्यान, सचिन वाझेच्या वकिलांनी वाजेला घरातील सामान वापरण्यास मिळावे, असा अर्ज करून कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. उदा. टाॅवेल, ब्रश आणि इतर काही गोष्टी वापरण्यास मिळाव्यात असे म्हटले आहे. सचिन वाझे आणि रियाज काझी यांची न्यायालयीन कोठडी पाच मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख