अनिल देशमुख यांना अटक करावी लागेल

देशमुखांनी होम क्वारंटाईनमध्ये असताना पत्रकार परिषद कशी घेतली?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
Anil Deshmukh will have to be arrested says sudhir mungantiwar
Anil Deshmukh will have to be arrested says sudhir mungantiwar

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख हे ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. तर १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ते होम क्वारंटाईन होते. असे असताना त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना अटक करावीच लागेल, अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांनी देशमुखांच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा उपस्थित केला आहे. पवारांची पत्रकार परिषध सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर देशमुख यांनी १५ तारखेला पत्रकार परिषद घेतल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ देशमुख यांच्या ट्विटर अकाऊंटवरील आहे. ''१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, १५ ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पजत्र परिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?'', असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

तर सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत देशमुख यांच्या अटकेची मागणी केली. देशमुखांनी होम क्वारंटाईनमध्ये असताना पत्रकार परिषद कशी घेतली? त्यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार रुग्णालयातून घरी आल्यानंतर क्वारंटाईनचा सल्ला दिला जातो. असे असताना देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच रुग्णालय प्रशासनानेही पत्रकार परिषद घेण्यात परवानगी कशी दिली?, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक करावीच लागेल, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. देशमुख यांनी १५ तारखेला नागपूरच्या अॅलेक्सिस रुग्णालयात पत्रकार परिषद घेतली होती.

दरम्यान, देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Waze) यांना मुंबईतल्या रेस्टाॅरंट्स, डान्स बारमधून महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा दावा परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आपल्या पत्रात केला होता. त्यावरुन राजकीय धुरळा उडाला आहे.

विरोधी पक्ष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यावर आज पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची पाठराखण केली. पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लेटरबाँब प्रकरणात रिबेरोंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी, असे काल सूचित केले होते. 

फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला १०० कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत १ हजार ७५० बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून ४० ते ५० कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांनी जमा करावेत, असे सांगितल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला होता.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com