धनंजयचेही असेच झाले होते...चौकशीआधीच राजीनामा कशाला? - Ajit Pawar reaction on Pooja Chavan case | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजयचेही असेच झाले होते...चौकशीआधीच राजीनामा कशाला?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे राठोड गुरूवारी यावर खुलासा करण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केले.

ते म्हणाले, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी पुणे शहर पोलिस करत आहेत. कोणीही व्यक्ती असुदे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत एखाद्याला त्या पदावरुन हटवायचे हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते मुंबईत पत्रकारांशी होलत होते. 

यावेळी पवार म्हणाले की, संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत असे मला कळले, त्यांच्यावर आरोप झाले आहेत. त्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे असे आम्ही सांगितले आहे. मात्र, माझे बोलणे त्यांच्याशी झाले नाही. त्या मुलीला व्यवसाय करायचा होता. तिचे वडील सांगत होते, की ती आमचा मुलगा आहे.

 पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी नवाब मलिकांचा राठोडांना 'हा' सल्ला...

तिला पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता. दुर्दैवाने बर्ड फ्लूच संकट आले आणि व्यवसाय अडचणीत आला. तिच्या वडिलांनी हे स्वतः सांगितले असल्याचे पवार म्हणाले. मात्र, चौकशी पूर्ण होत नाही, तो पर्यंत संशयाच्या भोऱ्यात टाकणे योग्य नाही. अशा प्रकरणांमध्ये एखाद्या मोठया व्यक्तीचे नाव आल्यानंतर त्या प्रकरणाला वेगळी प्रसिद्धी दिली जाते, असे ते म्हणाले. 

राजकीय जीवनात ते काम करत आहेत. पोलिसांनी आज एकाला ताब्यात घेतल आहे. पोलिस त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. आताच्या घडीला ती व्यक्ती निर्दोश आहे, ही तर वस्तुस्थिती आहे. धनंजय मुंडे यांच्याबद्दल ही असचे झाले होते. त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारचे आरोप झाले. लगेच त्यांनी राजीनामा दिला असता तर त्यांची बदनामी झाली असती. यात कोणालाही पाठीशी घालायचे काही कारण नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात दोन जण पुणे पोलिसांच्या ताब्यात 
 

संजय राठेड शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेऊ शकते, असे माझे स्पष्ट मत आहे. जोपर्यंत चौकशीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत थोडासा धीर ठेवावा लागणार आहे. चौकशी पूर्ण न होता ज्या वेळी मीडिया त्यांना लक्ष करत असतो. तेव्हा ती व्यक्ती थोडा बाजूला राहायचा प्रयत्न करत करते, असे पवार म्हणाले. 

पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी कधी पूर्ण होणार हे पोलिस सांगतील. मी काही होम मिनिस्टर नाही. मी पुण्याला गेल्यानंतर त्यांना विचारेल पत्रकारांना प्रश्न पडलेला आहे, चौकशी कधी होईल, असे सांगत पवारांनी पत्रकारांची फिरकी घेतली. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही. तोपर्यंत चौकशी सुरू राहील असेही, असे त्यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख