मनसेच्या दणक्यानंतर आदित्य नारायण याने  "त्या" विधानाबाबत मागितली माफी..

अलिबागबद्दल असे काहीही वक्तव्य करशील, तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन, असा इशारा मनसे दिला होता.
Sarkarnama Banner - 2021-05-25T144937.833.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-25T144937.833.jpg

मुंबई  : सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल-१२’  Indian Idol हा शो पुन्हा एकदा वादात सापडला आहे.  गायक किशोर कुमार यांच्यावरील स्पेशल एपिसोड नुकताच प्रसारीत झाला. या एपिसोडवरुन वाद निर्माण झाला होता. अमित कुमार यांनी या शो बाबत नाराजी व्यक्त केली होती. हा वाद संपत नाही, तर पुन्हा आदित्य नारायण  Aditya Narayan याच्यामुळे हा शो वादात सापडला आहे.  indian idol 12 host aditya narayan apologises for his alibaug comment after mns warns  

पहिला इंडियन आयडल अभिजीत सावंतनेही या शो वर नाराजी व्यक्त केली. या शो मधील स्पर्धेक, निर्माते  तर कधी परीक्षक यांच्यामुळे या शोवर टीका झाली आहे. आता  युवा गायक आदित्य नारायण हा या शोचे सूत्रसंचालन करीत आहे. या वेळी आदित्यने अलिबागविषयी केलेल्या व्यक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.  ‘इंडियन आयडल १२’ या शो दरम्यान एका स्पर्धकाला गाणे संपल्यानंतर आदित्यने अलिबागवरुन टोला लगावला होता. 

आदित्य नारायण याने याप्रकरणी फेसबुकवर पोस्ट शेअर करुन मनसेची माफी मागितली आहे. आदित्य नारायण यांच्याबाबत कारवाई करण्याचा इशारा मनसेने दिला होता.  यापुढे अलिबागबद्दल असे काहीही वक्तव्य करशील, तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन, असा इशारा दिला होता. याप्रकरणी निर्मात्यांना माफी मागावी, अशी मागणी मनसेचे चित्रपट सेना प्रमुख अमेय खोपकर यांनी केली आहे. अमेय खोपकर यांनी फेसबुक व्हिडीओद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला. एका फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात खोपकर म्हणाले होते की, एका हिंदी वाहिनीवर एका गाण्याच्या कार्यक्रमात आदित्य नारायण याने अलिबागविषयी अपमानकारक टिप्पणी केली आहे. त्याने याबाबत माफी मागावी. 

यासंदर्भात आदित्य नारायणने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, यात तो म्हणाला, मला हात जोडून नम्रपणे अलिबागमधील लोकांची आणि माझ्या इंडियन आयडलमधील वक्तव्यामुळे दुखावलेल्या सर्वांची माफी मागायची आहे. माझा कुणालाही दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. अलिबागबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे. माझ्या स्वत:च्या त्या जागेशी, लोकांशी आणि मातीशी भावना जोडल्या गेल्या असल्याचे म्हणत आदित्यने केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
Edited by : Mangesh Mahale   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com