TOOLKIT प्रकरणी राहुल गांधीं म्हणाले.. "सत्य डरता नहीं है.."   - toolkit issue rahul gandhi says truth remains unafraid | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

TOOLKIT प्रकरणी राहुल गांधीं म्हणाले.. "सत्य डरता नहीं है.."  

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

 राहुल गांधी यांनी कथित कोविड टुलकिट प्रकरणी आज टि्वट केलं.

नवी दिल्ली :  दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलच्या टीमने ट्विटर इंडियाच्या कार्यालयात काल सायंकाळी छापा मारला. दिल्लीत तसेच गुरगावच्या ट्विटरच्या कार्यालयात ही छापेमारी टीमकडून करण्यात आली. त्याआधीच काल दुपारी या टीमने ट्विटरला नोटीस पाठवली होती. toolkit issue rahul gandhi says truth remains unafraid

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात या कथित टूलकीट प्रकरणात ट्विटरलाही माहिती शेअर करण्यासाठी सांगितले आहे. ट्विटरने मॅनिप्युलेटेड मिडिया हा टॅग का वापरला याचेही स्पष्टीकरण देण्याचे नोटीशीत म्हटले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने ट्विटरला मॅनिप्युलेटेड मिडिया प्रकरणात नोटीस पाठवली आहे. नरेंद्र मोदी सरकारविरोधात काही पोस्टला Manupulated media टॅग वापरल्याच्या प्रकरणातील ही चौकशीच्या निमित्ताने नोटीस पाठवण्यात आली आहे.  कॅाग्रेसचे नेते राहुल गांधी rahul gandhi यांनी कथित कोविड टुलकिट प्रकरणी आज टि्वट केलं. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे की, "सत्य डरता नहीं है."  

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जेव्हा "झिंगाट" होतात..(व्हिडिओ पाहा)  

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॅाग्रेसच्या टुलकिटवरुन टि्वट करीत कॅाग्रेसवर निशाणा साधला होता. त्याला टि्वटरने संबित पात्रा यांच्या टि्वटला बनावट, फेरफार केलेलं टि्वट असल्याचे सांगितलं होते.  कॅाग्रेसच्या या टुलकिट बाबत वकील शशांक शेखर झा यांनी याचिका दाखल केली आहे. जगात भारताची प्रतिमा खराब करणे, सरकारविषयी जनतेमध्ये अपप्रचार करणे या कारणावरुन कॅाग्रेसच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआईए)च्या माध्यमातून याचा तपास करण्यात यावा, आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्ते शशांक शेखर झा यांनी केली आहे. यात दोषी आढळल्यास कॅाग्रेसची मान्यता रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक वृत्तवाहिन्या जो अजेंडा राबवत आहेत, ते टूलकिट आता मिळाले आहे. सोशल मीडियामध्ये काँग्रेसचे एक टूलकिट राबवले जात आहे. ज्यात महामारीच्या काळात कशा प्रकारे राजकारण करायचे, याचे पद्धतशीर निर्देश आहेत.  जनतेमध्ये भ्रम पसरवून त्यांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे.  आता काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, असे संबित पात्रा यांनी म्हटलं होते. 

काँग्रेसने हे आरोप फेटाळले असून भाजप बनावट टुलकिटचा उपयोग करुन कॅाग्रेसच्या विरोधात समाजात गैरसमज पसरवित आहे. याप्रकरणी संबित पात्रा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याच्या तयारीत कॅाग्रेस आहे.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख