आरेमध्ये लाचेची मलई खाणाऱ्याला पकडले....तब्बल साडेतीन कोटीची रोकड जप्त

घरात ३ कोटी ४६ लाख १० हजारांची रोकड सापडली आहे.
Aarey Milk Colony CEO Nathu Rathore was caught taking bribe
Aarey Milk Colony CEO Nathu Rathore was caught taking bribe

मुंबई  ः आरे दूग्ध वसाहतीचे (Aarey Milk Colony) मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड (Nathu Rathore) हे अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले असून त्यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. राठोड याच्या घरात तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रोकड लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती झडतीदरम्यान लागली आहे. (Aarey Milk Colony CEO Nathu Rathore was caught taking bribe)

तक्रारदार व्यक्तीला घराची दुरुस्ती करण्यासाठी परवानगी हवी होती. या परवानगीसाठी वसाहतीचे कार्यकारी अधिकारी राठोड यांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोड अंती ५० हजार रुपये लाच देण्यास तक्रारदारास सांगितले. लाच घेण्यासाठी राठोड यांनी लोकसेवक अरविंद तिवारी यांना पाठवले होते.

हेही वाचा : लागेल ती मदत देतो; पण कोणाला वर्गणी अथवा देणगी मागू नका
 
घर दुरुस्तीच्या परवानगीला लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार लाच घेताना तिवारी यांना रंगेहाथ पकडले. अरविंद तिवारीच्या चौकशीतून राठोड यांचे नाव समोर आले.

आरे दूग्ध वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड  यांच्या घराची झडती घेतली असता घरात ३ कोटी ४६ लाख १० हजारांची रोकड सापडली आहे. घरात एवढी मोठी रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहे.

हेही वाचा : नेतृत्व बदलाची पुन्हा चर्चा : हे नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक 
 

बंगळूर : कर्नाटकात  कोविड साथीच्या आजाराने थैमान घातलेले असतानाच नेतृत्व बदलाच्या मागणीने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. बी. एस. येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा  दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आला आहे. त्याबरोबर नेतृत्व बदलाची कुरबूर सुरू झाली आहे.  

 
मंत्रिमंडळांतर्गत संघर्ष, सरकार आणि पक्ष यांच्यात वाढत असलेल्या दरीवरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये असंतोष आहे. राज्यातील नेतृत्वासाठी काही नेते आणि गट हायकमांडकडे आतापासूनच प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे. केंद्रीय नेतृत्वाने कर्नाटकात नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेतल्यास आपल्याच नावाचा विचार व्हावा, यासाठी काही नेत्यांनी लॉबिंग करण्यास सुरवात केली आहे. 
 
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गृहमंत्री बसवराज बोम्मई, मुरगेश निराणी मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असून त्यांनी तशा हालचालीही सुरू केल्याचे समजते. यावर हायकमांडच्या निर्णयाची त्यांना प्रतीक्षा आहे. मात्र पक्षातील अधिकृत सूत्रांच्या मते, किमान कोरोना कमी होईपर्यंत नेतृत्वात बदल होण्याची शक्यता नाही. हायकमांड त्याला कोणत्याही परिस्थितीत अनुकूलता दर्शविणार नाही. दिल्लीतील केंद्रीय नेत्यांशी सातत्याने संपर्कात असलेले भाजपचे आमदार अरविंद बेल्लद यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. कोविड-१९ बरोबर झुंजण्यासाठी सरकार धडपडत असतानाच, कर्नाटकमधील भाजपला पक्षाचे आमदार आणि नेत्यांना एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com