लागेल ती मदत देतो; पण कोणाला वर्गणी अथवा देणगी मागू नका - Necessary help will be given for corona remedial schemes : Jayant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

लागेल ती मदत देतो; पण कोणाला वर्गणी अथवा देणगी मागू नका

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 25 मे 2021

नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका दिली जाईल.

वाळवा (जि. सांगली) : येत्या चार दिवसांत वाळवा (Valva) येथे विलगीकरण कक्ष तातडीने सुरू केला जाईल. तसेच, आरोग्य केंद्राला (Health Center) नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका (Ambulance) दिली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे बोलताना दिली.

दरम्यान, कोरोनाच्या उपाय योजनांसाठी आरोग्य केंद्राला लागेल ती मदत देण्यात येईल. पण, कोणालाही वर्गणी किंवा देणगी मागू नका, अशी ताकीदही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली. (Necessary help will be given for corona remedial schemes : Jayant Patil)

वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन कोरोनाचे रुग्ण आणि उपाय योजनांची माहिती घेतली. या वेळी आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळावी, होम क्वारंटाईन असणाऱ्या रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. 

हेही वाचा : नेतृत्व बदलाची पुन्हा चर्चा : हे नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक 

याबाबत जयंत पाटील यांनी कोरोनाच्या उपाय योजनांसाठी आरोग्य केंद्राला लागेल ती मदत देण्यात येईल. पण, कोणालाही वर्गणी किंवा देणगी मागू नका, असे सांगितले. सांगली जिल्ह्यात कोविडच्या 14 हजार लशी उपलब्ध झाल्या असून प्रत्येक आरोग्य केंद्राला लस उपलब्ध करून दिली जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

या वेळी वाळवा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील व वाळवा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी यांनी एकूण सक्रिय रुग्ण, दाखल असणारे, उपचार घेणारे तसेच होम क्वारंटाईन असणारे रुग्ण याची माहिती मंत्री जयंत पाटील यांना दिली. तहसीलदार रवींद्र सबनीस, प्रांताधिकारी विजय देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे आदींनी कोरोना नियोजनाबाबत माहिती दिली.

वाळवा पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, संग्राम पाटील, बाळासाहेब पाटील, पोलिस निरीक्षक अजित सिद, ग्रामपंचायत सदस्य वर्धमान मगदूम, मिलिंद थोरात, किसन गावडे, राजारामबापू बँकेचे संचालक जयकर गावडे, जालिंदर थोरात या वेळी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख