ncp president sharad pawar again meets chief minister uddhav thackeray | Sarkarnama

आघाडीत सर्व काही आलबेल...पुन्हा मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार भेट

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 जुलै 2020

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विसंवाद असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुन्हा भेट झाली आहे. 

मुंबई : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पारनेर व कल्याण येथील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक संघर्ष यावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज पुन्हा एकदा मातोश्रीवर बैठक झाली. 

मागील काही दिवसांत राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद झाल्याची चर्चा सुरू झाली होती. यामागे मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पारनेर व कल्याण येथील शिवसेना राष्ट्रवादीतील स्थानिक संघर्ष ही कारणे होती. दोन्ही पक्षांमध्ये तणावही निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत मागील आठवड्यातच हा तणाव दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेऊन पवार यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली होती. मुंबईतील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने ही भेट महत्त्वाची ठरली होती. पवारांनी यामध्ये शिष्टाई करत झालेल्या असमन्वयावर तोडगा काढला. आज पवारांच्या भेटीनंतर या पोलिस अधिकाऱ्यांच्या संदर्भातील बदल्यांचे नवीन आदेश  तातडीने काढण्यात आले. मागील रद्द करण्यात आलेल्या बदल्यांमधील अधिकारी नव्या आदेशात बदलेले असून, यातून मुख्यमंत्र्यांनी आघाडीतील समन्वय कायमच राहणार असल्याचे संकेत दिले. 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज सायंकाळी पाचच्या सुमारास भेट झाली. त्यामुळे महाविकास आघाडी चर्चेच्या मध्ये शरद पवार हे यशस्वी शिष्टाई करण्यात सफल होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या भेटीने आघाडी सरकारमधील मतभेद दूर होऊन सर्व काही आलबेल झाले असल्याचे समजते. 

कल्याण, डोंबिवली, ठाण्यासह मीरा-भाईंदरमध्ये वाढला लॉकडाउन

मुंबई : ठाणे शहरात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरात 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत टाळेबंदी लागू केली. या टाळेबंदीत आणखी आठ दिवसांची वाढ करून 19 जुलैपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. याचबरोबर केडीएमसी आणि मीरा-भाईंदर महापालिकेनेही कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. झोपडपट्टीपाठोपाठ अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोळशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशावेळी सुरुवातीला ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी 2 ते 12 जुलै अशी 10 दिवस टाळेबंदी लागू केली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख