Anil Deshmukhs son in law Gaurav Chaturvedi in CBI custody
Anil Deshmukhs son in law Gaurav Chaturvedi in CBI custody

मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्या जावयाची सीबीआयकडून झाडाझडती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणांनी त्यांच्या भोवतीचा फास आणखी आवळत चालवला आहे. सीबीआयने बुधवारी रात्री त्यांचे जावई गौरव चतुर्वेदी व वकील आनंद डागा यांना ताब्यात घेतलं होतं. गौरव यांची सुमारे वीस मिनिटे चौकशी केल्यानंतर सीबीआयकडून सोडण्यात आलं. डागा यांची मात्र अजूनही चौकशी सुरू असल्याचं समजतं. (Anil Deshmukhs son in law Gaurav Chaturvedi in CBI custody)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. परमबिर सिंह याच्या लेटरनंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयानं सीबीआय परवानगी दिली आहे. त्यानुसार प्राथमिक तपासानंतर सीबीआयकडून देशमुखांवर गुन्हाही दाखल केला आहे. तर ईडीकडून मनी लाँर्डिंगच्या संशयावरून देशमुखांची चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात त्यांचे जावई गौरव यांनाही सीबीआयने बुधवारी रात्री वरळी येथील सुखदा या इमारतीजवळ ताब्यात घेतले होते. त्यांना सीबीआयच्या कार्यालयात नेऊन सुमारे वीस मिनिटे चौकशी करण्यात आल्याचे समजते. चौकशीनंतर त्यांना सोडून दिल्याचंही वृत्त आहे. 

दरम्यान, देशमुख कुटूंबियांनी गौरव यांचं अपहरण झाल्याचा दावा केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून कुणालाही ताब्यात घेण्यापूर्वी नोटीस देणं किंवा इतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या जातात. पण गौरव यांना अचानक 8 ते 10 लोकं घेऊन गेली आहेत. त्यांना कुठं नेलं याचा काहीच तपास नाही, असा दावा देशमुख कुटूंबियांनी केला आहे. 

मनी लाँर्डिंग प्रकरणात देशमुख यांचे सहायक कुंदन शिंदे व स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्याविरोधात ईडीने नुकतेच दोषारोपपत्र दाखल केलं आहे. देशमुखबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि असिस्टंट कुंदन शिंदे यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप आहे. या दोघांवर बार मालकांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com