‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन

‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) माध्यमातून राज्यभरातील युवकांच्या अधिवेशनाची सुरवात नाशिकमध्ये आज पासून होईल. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘यश-इन’ सभागृहात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरवात होईल.
‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन
YIN

नाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील युवकांच्या अधिवेशनाची सुरवात नाशिकमध्ये आज पासून होईल. (Youth convention in nashik from today) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘यश-इन’ सभागृहात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरवात होईल. 

यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे उपस्थित राहतील. हे अधिवेशन १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या निमित्ताने उद्याचे युवा नेतृत्व असलेले राज्यभरातील युवा दाखल झाले आहेत. 

ई. वायुनंदन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. अधिवेशनात सकाळी अकराला तेलंगणा जलसंवर्धन विकास महामंडळाचे अध्यक्ष व्ही. प्रकाश राव पाणी आणि युवक या विषयावर संवाद साधतील. तसेच सायंकाळी साडेपाचला नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे मार्गदर्शन होईल. अधिवेशनासाठी ‘यिन’च्या शॅडो कॅबिनेटमधील मंत्री, ‘यिन’चे प्रतिनिधी शहरात दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवरील आठ ठराव केले जातील. ठरावांवर होणाऱ्या विचारमंथनातून संबंधित विषय राज्य सरकारमधील मंत्री यांच्याकडे सुपूर्द केले जातील. ‘यिन’ शॅडो मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री अजय खांडबहाले आणि मुख्य कोअर टीमने अधिवेशनाची तयारी पूर्ण केली आहे. सद्यःस्थितीत नाशिकचे हवामान आल्हादायक असल्याने अधिवेशनातील युवकांचा उत्साह द्विगुणित होणार आहे. अधिवेशनासाठी विद्यापीठाचे सभागृह प्रतिअधिवेशनाप्रमाणे सजले आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार हेमंत गोडसे, विश्‍वास बँकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर, भाजप नेते पाशा पटेल, ‘साम’चे कार्यकारी संपादक प्रसन्ना जोशी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार नीलेश लंके, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, अभिनेता पुष्कर श्रोत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील राज्यभरातील युवकांशी संवाद साधतील.

अधिवेशनात आज
० सकाळी अकरा : तेलंगणा जलसंवर्धन विकास महामंडळाचे अध्यक्ष व्ही. प्रकाश राव
० दुपारी बारा : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
० दिवसभरातील इतर सत्रांमध्ये-विविध आठ विषयांवर ठराव आणि चर्चा
० सायंकाळी साडेपाच :  नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे 

...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in