अतिवृष्टीतील मृत्युमुखींच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर 

राज्य सरकार जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.
अतिवृष्टीतील मृत्युमुखींच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर 
State government announces Rs 5 lakh assistance to heirs of flood victims

मुंबई : अतिवृष्टीने राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे. महाड तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळून सुमारे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २३ जुलै) सायंकाळी जाहीर केली. (State government announces Rs 5 lakh assistance to heirs of flood victims)

दरम्यान, केंद्र सरकारकडूनही या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तर प्रत्येक जखमीला 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशी घोषणा केंद्र सरकारकडून दुपारी करण्यात आली आहे. राज्य सरकार जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तसेच, या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

महाड तालुक्यातील तळई गावात अतिवृष्टीमुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. राज्यात दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक जखमीला 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही दुपारी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत राज्यातील पूरस्थितीची माहिती घेतलेली आहे. 

दरम्यान, महाडमध्ये गुरुवारी दरड कोसळल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई हे गाव डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 ते ४० घरे दबली गेली आहेत. दरड कोसळल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी ढिगाऱ्याखालून 38 जणांचे मृतदेह बाजूला काढले. आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या मुसळधार पाउस सुरु असल्यामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in