...म्हणून नारायण राणेंच्या अटकेसाठी ठाकरेंनी दीपक पांडेची निवड केली!

`केंद्रीय मंत्र्याला अटक होत नाही` आणि `अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे का?` केंद्रीय मंत्री मंत्री नारायण राणे यांसह भाजपच्या बहुतांश नेत्यांचे दोन मोठे गैरसमज महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी दूर केले. यामागे दोन व्यक्ती आहेत. माध्यमांत उघडपणे दिसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पडद्यामागे हे अशक्य शक्य करणारे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे.
Rane- Thakre
Rane- Thakre

नाशिक : `केंद्रीय मंत्र्याला अटक होत नाही` (Police can not arrest Center Minister) आणि  `अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे का?` (I am not ordinery citizen to be arrest) केंद्रीय मंत्री मंत्री नारायण राणे (Centre minister Narayan Rane) यांसह भाजपच्या बहुतांश नेत्यांचे दोन मोठे गैरसमज महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी दूर झाले. (maharashtra police clear this missunderstang on Tuesday) यामागे दोन व्यक्ती आहेत. माध्यमांत उघडपणे दिसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre)आणि पडद्यामागे हे अशक्य शक्य करणारे नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे. (Deepak Pandey)  

केंद्रीय मंत्र्याला अटक झाली, ही मंगळवारची राष्ट्रीय स्तरावर चर्चेची बातमी होती. मात्र हे अशक्य शक्य करून दाखविण्याचा संदेश नाशिक शहरातून गेला आहे. त्यामागे पोलिस आयुक्त दीपक पांडे ही व्यक्ती आहे. श्री. पांडे प्रशासकीय व्युहरचनेत वाकबगार आहेत. शहरात आल्या आल्या भूमाफीयांवरील कारवाई आणि शंभर जणांना मोक्का ही त्यांची कारवाई न्यायालयानेही वैध ठरवली. 

श्री. राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत असभ्य भाषेचा वापर सुरु केल्यावर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा आग्रही विचार सरकारमधील शिवसेनेत होता. त्यावर प्रचंड खल झाला. रात्रभर चर्चा चर्वणानंतर त्याला होकार मिळाला. मात्र कारवाई कोण करणार? राज्यातील बहुतांश पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुखांनी लांब राहणेच पसंत केले. मात्र श्री. पांडे यांनी यातील तरतुदींचा बारीक अभ्यास करून मार्ग दाखवला. कारवाई आधी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर अर्थात शहरातील जबाबदार व्यक्ती म्हणून तक्रार घेण्यात आली. शिवसेनेच्या अन्य मोठ्या नेत्यांचे जबाब नोंदविण्यात आले. आणि भा.द. वि. कलम ५०० व अन्य कलमांचा आधार घेतला.

व्यक्तीगत उद्धव ठाकरे नव्हे तर मुख्यमंत्री या घटनात्मक पदाबाबत श्री. राणे यांचे वक्तव्य दूरचित्रवाहिनीवर ऐकले. त्यामुळे सायबर क्राईम शाखेकडे गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्र्याला अटकेपासून संरक्षण नाही. फक्त अटके नंतर त्याची माहिती उपराष्ट्रपतींना देणे, हे बंधन आहे. ही तरतूद आमदारांबाबत देखील आहे. त्यामुळे पांडे यांनी हा `करेक्ट` कार्यक्रम केला. यापूर्वी तसे झालेले नव्हते, हे विशेष.

सुधाकररावांची आठवण!
यातील संदेश म्हणजे, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याविषयी ते आपल्या राजकीय विरोधकांना `सावज टप्प्यात येण्याची वाट पाहतात. टप्प्यात आले की, बार उडवतात` हा संदेश खुपच गाजला होता. उद्धव ठाकरेंनी आपल्या राजकीय, वैचारीक व कृतीशील विरोधक असलेल्या श्री. राणे यांच्याबाबत देखील असेच काहीसे केले आहे. हा संदेश शांत स्वभावाच्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. त्यामुळे त्यांचा पक्ष देखील अचानक अॅक्टीव्ह मोडवर येऊन आक्रमक झाला. हे त्यांच्या दृष्टीने हिताचेच झाले. राज्यात तीन पक्षाचे सरकार असले तरी, फ्रंटलाईन शिवसेना आहे हे त्यांनी दाखवून दिले.

 भाजप नेत्यांची अती घाई
या सर्व प्रकारांत भारतीय जनता पक्षाची मात्र थोडी नाही तर मोठी अडचण झाली. त्यातही राजकारणात वाट पहा, विचारपूर्वक बोला याचा या पक्षातील नेत्यांना विसरच पडलेला दिसतो. त्यामुळे हा गोंधळ अधिक वाढविण्यास भाजपच्या नेत्यांनी हातभारच लावला. यातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे, `राणे यांच्या विधानाशी सहमत नाही, मात्र पक्ष त्यांच्या पाठीशी आहे` आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे `केंद्रीय मंत्र्यांना अटक होत नसते` ही विधाने आहेत. विधानाशी सहमत नाही याचा अर्थ त्यांना पाठींबा देणे हे देखील राजकीय सभ्यतेला धरून नाही. मात्र फडणवीस एक शब्द बोलावा तीथे चार वाक्य बोलत असल्याने हे झाले होते. मात्र हे सर्व शाब्दीक बाण शिवसेनेच्या उद्दव ठाकरेंनी निष्प्रभ केले. त्यामुळे सकाळी आक्रमकपणे पत्रकार परिषद घेणारे श्री. राणे यांनी काही वेळातच अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यातून काय ते संदेश गेलाच होता.  

`तो`व्हीडीओ नको होता!
तिसरा प्रकार टाळणे अत्यंत गरजेचा होता तो म्हणजे, अचनाक उत्साह वाढलेले नेते प्रसाद लाड यांनी राणे यांना अटकेसाठी पोलिस गेले असता त्यांना जेवणावरून उठावे लागले हा व्हीडिओ व्हायरल करण्याची घाई.  श्री. लाड यांनी केंद्रीय मंत्री राणे यांचा व्हीडिओ व्हायरल केल्याने राणे यांचा दरारा किमान पोलिसांपुढे तरी संपला हा संदेश गेला. त्यामुळे यापुढे श्री. राणे यांच्याकडे असलेले ते बहुदा एकमेव शश्त्र बोथट ठरणार आहे. त्याची किंमत भाजपला आगामी काळात मोजावी लागू शकते. 

इतर गुन्ह्यांचे काय?
श्री. राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठी भाजपने मंत्री केले अशी चर्चा श्री. राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून पसरली होती. आता राणे यांना न्यायालयाने सशर्त जामीन देताना ज्या चार बाबींचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्या पाहता त्यांच्यावर बंधने आली आहेच. कारण राज्याच्या अनेक पोलिस ठाण्यांत राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याचे काय होणार हा प्रश्न देखील त्यांना अस्वस्थ करीत राहील. .
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com