नारायण राणे यांच्या विरोधात  पाच ठिकाणी तक्रारी 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बदनामीकारक आणि समजत द्वेष भावना भडकवणाई विधाने केल्या प्रकरणी आज सकाळी माणिकपूर (वसई,), नालासोपारा आणि तुळींज, भद्रकाली आणि नांदगाव (ता. नांशिक) पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात शिवसेनेने तक्रारी दाखल केल्या आहेत.
Narayan Rane
Narayan Rane

विरार : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बदनामीकारक (Narayan Rane made defamatory statemant against CM Uddhav Thakre) आणि समजत द्वेष भावना भडकवणाई विधाने केल्या प्रकरणी (This Statement hatred sentiment in the people)  आज सकाळी माणिकपूर (वसई,), नालासोपारा आणि तुळींज, भद्रकाली आणि नांदगाव (ता. नांशिक) (five cases register i the the various police station Today in the morning) पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात शिवसेनेने तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल  रायगड येथे बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपमानकारक, आपत्तीजन्य आणि समाजात तेढ निर्माण करणारे शब्द वापरून राज्याचा अपमान केला आहे. त्यांनी वापरलेले शब्द हे गुन्ह्याच्या स्वरूपाचे असल्याने त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. 

या तक्रारींवर माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर,विधानसभा संघटक विनायक निकम, सौ किरण चेन्दवणकर, उपजिल्हा प्रमुख नवीन दुबे, पंकज देशमुख, राजाराम बाबर, प्रथमेश राऊत यांच्या सह्या असून वसई तालुक्यातील शिवसेना याबाबत एकत्र आल्याचे चित्र याठिकाणी दिसत आहे.

दरम्यान यासंदर्भात नाशिक शहरातील सायबर क्राईम पोलिस ठाण्यात शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर तसेच नांदगाव येथे देखील गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. त्यामुळे राज्यात पाच ठिकाणी गुन्हे दाकळ झाले आहेत. शहर पोलिसांनी याबाबत पुढाकार घेऊन त्यांना अटक करण्याचे सुतोवाच केले होते. त्यानुसार श्री. राणे यांना दुपारी ताब्यात घेतले आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com