राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन अन् आठवडाभरातच बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

पुण्यातील डेंगळे पुल परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याशहर कार्यालयाचे उद्धघाटन शनिवारी झाले.
Ex MP Subodh Mohite joins NCP in presence of Sharad Pawar
Ex MP Subodh Mohite joins NCP in presence of Sharad Pawar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील बहुचर्चित कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (ता. 19) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आठवडाभरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एका बड्या नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Ex MP Subodh Mohite joins NCP in presence of Sharad Pawar)  

पुण्यातील डेंगळे पुल परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) शहर कार्यालयाचे उद्धघाटन शनिवारी झाले. यावेळी शेकडो कार्यकर्ते हजर झाल्याने मोठी गर्दी झाली होती. त्यामुळं कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन झालं. जमलेल्या गर्दीला जबाबदार धरून शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात जगताप यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आणि नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. 

या प्रकारामुळे राष्ट्रवादीचे नवीन कार्यालयत चर्चेत आलं. त्यानंतर आठवडाभरात शरद पवार पहिल्यांदा या कार्यालयात दाखल झाले. याचवेळी सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोहिते यांना राष्ट्रवादीचा झेंडा हाती दिला. त्यांच्यासोबत इतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय राष्ट्रवादीत आलो असून यापुढील राजकीय आयुष्य पवारांच्या सावलीत घालवणार असल्याचं मोहिते यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, सुबोध मोहिते हे पहिल्यांदा शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे काही कारणांवरून खटके उडाले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मात्र ते रामटेक मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा नशीब आजमावले पण तेथेही त्यांना यश आले नाही. त्यानंतर बराच कालावधी ते राजकारणापासून अलिप्त  होते. 

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सुबोध मोहिते हे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. राजकारणात येण्यापूर्वी युतीच्या कार्यकाळात ते भाजपचे मंत्री महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. शिवसेनेने 1998 मध्ये त्यांना रामटेक मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. यात ते काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव करून विजयी झाले. 1999 मध्ये पुन्हा त्यांनी श्रीकांत जिचकार यांचा पराभव केला. याच काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com