अनिल देशमुखांवर 'ईडी'ची कारवाई अन् शरद पवार म्हणाले, हे आमच्यासाठी नवीन नाही!

माजी गृहमंत्री अनिल देशमुखयांच्या नागपूर व मुंबईतील घरांवर आज ईडीने छापेमारी केली आहे.
NCP Chief Sharad Pawar slams BJP over ED raid on Anil Deshmukhs residence
NCP Chief Sharad Pawar slams BJP over ED raid on Anil Deshmukhs residence

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूर व मुंबईतील घरांवर आज ईडीने छापेमारी केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून असे प्रकार सुरू झाले आहेत. ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न असल्याची टीका पवारांनी केली आहे. (NCP Chief Sharad Pawar slams BJP over ED raid on Anil Deshmukhs residence)

पुण्यात माजी खासदार सुबोध मोहिते यांनी शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ईडीने अनिल देशमुख यांच्यावर केलेली कारवाई हे आमच्यासाठी नवीन नाही. त्यांच्या हाती काही लागले नाही म्हणून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. यंत्रणांचा राजकीय वापर होतोय. काल भाजपने केलेला ठराव हा त्याचाच भाग आहे.

ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न सुरू झाला आहे. देशमुखांच्या ईडी चौकशीची आम्हाला चिंता वाटत नाही. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून असे प्रकार सुरू झाले आहेत. नैराश्यातून या यंत्रणांचा वापर होत आहे. ईडीसारख्या चौकशा आमच्यासाठी नव्या नाहीत. केंद्र सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असे पवार म्हणाले. 

विरोधी पक्षांच्या बैठकीवर खुलासा

प्रशांत किशोर बैठकीबाबत गैरसमज आहेत. तसेच सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीबाबतही गैरसमज निर्माण झाले आहेत. मागील सहा महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यावर काही मार्ग काढता येईल का हा त्या बैठकीचा उद्देश होता, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आज सकाळी देशमुख यांनी मुंबई व नागपूर येथील घरांवर ईडीकडून एकाचवेळी छापे टाकण्यात आले. त्यामुळं देशमुख अडचणीत आले आहेत. ईडीसह सीबीआयकडून यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी सध्या कुटूंबियांचे जबाब घेतले जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com