लस खरेदीच्या ग्लोबल टेंडरवरून अजित पवारांनी भाजप नेत्यांना सुनावलं

लस खरेदी करण्यासाठी राज्य सरकार परवानगी देत नाही, असे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होतं.
Dy CM Ajit Pawar slams BJP leaders over corona vaccine global tender
Dy CM Ajit Pawar slams BJP leaders over corona vaccine global tender

पुणे : लस खरेदी करण्यासाठी राज्य सरकार परवानगी देत नाही, असे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी मुळात लस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढायचे झाले तर त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरजच नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या विषयावरून पुणे महापालिका व राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादावर पवार यांनी केलेल्या खुलाशामुळे पडदा पडला आहे. (Dy CM Ajit Pawar slams BJP leaders over corona vaccine global tender)

पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे राज्य सरकार ग्लोबल टेंडर करण्यासाठी परवानगी देत नाही, असा आरोप महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गुरूवारी केला होता. त्यावर विचारले असता अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. सध्याचा अनुभव लक्षात घेऊन आता कोणतीही उणीव राहणार नाही. तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी तयार करण्यात येत आहे.

ऑक्सिजन उत्पादनाचे 3 हजार मेट्रिक टनाचे टार्गेट ठरवले आहे. त्यात आणखी वाढ करण्याचा विचार सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजन कमी पडणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. कोरनावर मात करण्यासाठी परदेशातूनही मदत होत आहे. ही मदत केंद्राला होत असल्याने त्यातून प्रत्येक राज्याची गरज लक्षात घेऊन मदत करण्यात यावी, असे पवार यांनी सांगितले.

भारत बायोटेकने मागितली पुण्यात जमीन

पवार म्हणाले, ''भारत बायोटेकने जमीन मागितली होती. त्यानुसार त्यांना लागणाऱ्या सुविधा लवकरच दिल्या जातील, असे पवार यांनी सांगितले. सध्या लसींचा अपुरा पुरवठा आहे, त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्तास बंद आहे. म्युकरमायकोसीस या रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. उपचाराचा भाग म्हणून मोठ्या किमतीची इंजेक्शन द्यावी लागत आहेत. यासाठी येणारा खर्च १५ लाखांच्या दरम्यान आहे. हा खर्च विविध योजनांमध्ये बसविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’’

पुण्यात लसीकरणाचा वेग चांगला असल्याचे पवार यांनी सांगितले. आजपर्यंत 24 लाख 91 हजार 267 नागरिकांना लस दिलेली आहे.तिसऱ्या लाटेचा विचार करता वेगवेगळ्या भागात लहान मुलांसाठी हॉस्पिटल साठी प्रयत्न करत असल्याचे पवार यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बालरोग्तज्ञांचा टास्कफोर्स तयार करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com