मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र...केली महत्वाची मागणी

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली.
MP Sambhajiraje writes letter to CM Uddhav Thackeray over Maratha Reservation
MP Sambhajiraje writes letter to CM Uddhav Thackeray over Maratha Reservation

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर गुरूवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. १०२ व्या घटनादुरूस्तीनंतरही राज्यांना मागास प्रवर्ग ठरवण्याचे अधिकार असल्याचे सरकारने याचिकेत म्हटले आहे. या याचिकेनंतर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. (MP Sambhajiraje writes letter to CM Uddhav Thackeray over Maratha Reservation)

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनानेही मराठी आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मराठा आरक्षण कायदा (२०१८) सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवताना काही मुद्दे मांडलेले आहेत. त्यापैकी १०२ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राहत नाहीत, असे मत नोंदविले. १०२ वी घटनादुरूस्ती राज्यसभेत मंजूर करण्यापूर्वी सिलेक्ट कमिटी नेमण्यात आली होती. हा विषय २५ संसद सदस्यांच्या समितीपुढे ठेवण्यात आला. समितीने आपल्या अहवालामध्ये १२ व्या मुद्द्यात 'या घटनादुरूस्तीमुळे राज्य मागासवर्ग आयोगांना मागास यादीमध्ये एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्याचा असलेला अधिकार बाधित होत नाही,' असे नमूद केले आहे, असे पत्रात म्हटले आहे. 

मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना ही घटनादुरूस्ती व राज्यांचे अधिकार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यावेळी मी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची भेट घेत केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून संभ्रम दूर करण्याची विनंती केली होती. सरकारच्या वतीने न्यायालयात राज्यांचे अधिकार बाधित होत नसल्याचे स्पष्टपणे मांडण्यात आले, असे संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे. 

न्यायालयाने मराठा आरक्षणावर निकाल देताना १०२ व्या घटनादुरूस्तीमुळे राज्य शासनास आरक्षण देण्याचे अधिकार नसल्याचे मत नोंदविले. याबाबत केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्याच पद्धतीने हा संपूर्ण विषय महाराष्ट्र शासनाशी व शासनाला असलेल्या अधिकारांशी थेट निगडीत असल्याने, तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर ठेवताना राहिलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी व अंतिमतः मराठा आरक्षण टिकविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील अशी फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com