भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला; सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

गाडीमध्ये कुमार आयलानी यांचा मुलगा होता. पण त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
Attack on Ulhasnagar BJP Mla Kumar Ailani car caught in cctv
Attack on Ulhasnagar BJP Mla Kumar Ailani car caught in cctv

उल्हासनगर : उल्हासनगर येथील भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर शनिवारी रात्री हल्ला झाल्याचे समोर आलं आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीवर एका तरूणाने दगड मारून काच फोडल्याचे स्पष्ट झालं आहे. या गाडीमध्ये कुमार आयलानी यांचा मुलगा होता. पण त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. (Attack on Ulhasnagar BJP Mla Kumar Ailani car caught in cctv) 

कुमार आयलानी यांचा पुत्र धीरज आयलानी मर्सिडीज MH O5 DH 5555 ही गाडी घेऊन उल्हासनगर महापालिकेमागील आंबे स्पोर्टस् क्लब जवळ उभे होते. तेवढ्यात एका तरूणाने गाडीवर दगडाने हल्ला केला. यावेळी धीरज हे गाडीमध्ये होते. ते थोडक्यात बचावले असून गाडीच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अज्ञात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. गाडीवर दगड मारल्यानंतर तरूण तिथून निघून गेल्याची दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तसेच तो तरूण गेल्याच्या दिशेनची सीसीटीव्ही फुटेजही तपासली जात आहेत. लवकरच तरुणाचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

आयलानी यांना दिला होता इशारा

भाजपमधून काढण्यात आलेले माजी प्रवक्ते राम वाधवा यांनीही काही दिवसांपूर्वीच आमदार आयलानी यांना इशारा दिला होता. मतदारसंघात फिरून लोकांच्या समस्या न सोडवल्यास आमदार असेपर्यंत रोज एकजण त्यांना चप्पल मारेल, अशा इशारा वाधवा यांनी दिला होता. त्यानंतर आयलानी यांनी याबाबत पोलिसांना पत्र देत कारवाईची मागणीही केली होती.

Edited By Rajanand more

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com