चिंता वाढली; 'हायब्रीड' कोरोना सापडला...हवेतून वेगानं पसरतोय

भारतात आढळणारा कोरोना विषाणूचा प्रकार B.1.617 हा पहिल्यांदा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सापडला.
चिंता वाढली; 'हायब्रीड' कोरोना सापडला...हवेतून वेगानं पसरतोय
Hybrid of corona variant found in India And UK spreads quickly

हनोई : चीनमधून कोरोना (Covid-19) संसर्ग सुरू झाल्यानंतर जगभरात थैमान घातले आहे. त्यानंतर कोरोना विषाणू सातत्याने रुप बदल असल्याचेही विविध अभ्यांसातून स्पष्ट झालं आहे. कोरोनाचे असे शेकडो प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. भारतात दुसऱ्या लाटेसाठीही कोरोनाचा नवीन प्रकारच कारणीभूत ठरल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) मान्य केले आहे. आता कोरोनाचा आणकी एक प्रकार समोर आला असून तो जगाची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Hybrid of corona variant found in India And UK spreads quickly ) 

व्हिएतनाममध्ये कोरोनाचा हा नवीन प्रकार आढळून आला आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये आढळून येणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांचा हा हायब्रीड प्रकार असल्याचा दावा व्हिएतनाममधील शास्त्रज्ञांनी केला आहे. हा विषाणू हवेतून वेगाने पसरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. व्हिएतनामध्ये सध्या कोरोना रुग्णांची वाढ वेगाने होत आहे. तेथील आरोग्यमंत्री गुयेन थान लॅान्ग यांनी कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत एका बैठकीत माहिती दिली. 

हवेतून वेगाने पसरतो 

कोरोनाचा हायब्रीड प्रकार हवेतून वेगाने पसरत आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर खोकल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एका व्यक्तीपासून परिसरात हा विषाणू वेगाने पसरत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. आरोग्यमंत्र्यांनी या कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती मात्र दिली नाही. व्हिएतनाममधील सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ हायजीन अॅन्ड एपिडेमियोलॅाजीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार त्यांच्या शास्त्रज्ञांनी 32 रुग्णांच्या चार नमुन्यांमध्ये हा प्रकार आढळून आल्याचे सांगितले आहे.  

दरम्यान, भारतात आढळणारा कोरोना विषाणूचा प्रकार B.1.617 हा पहिल्यांदा मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सापडला. आता जगभरातील 44 देशांमध्ये सापडला आहे. हा विषाणू अतिशय वेगाने संसर्ग पसरवणारा आहे. भारतातील सुमारे 0.1 टक्के कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यांची जिनोस सिक्वेन्स तपासणी करण्यात आली आहे. 

डब्लूएचओने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सापडणारा B.1.17 आणि भारतात सापडणारा B.1.617 मागील काही आठवड्यांपासून काही कमी होऊ लागले आहेत. परंतु, चिंतेची बाब म्हणजे आणखी धोकादायक म्युटेशन्स तयार झाले असून, ते B.1.617.1 आणि B.1.617.2 आहेत. B.1.617 पासून तयार झालेले नवीन प्रकार अधिक संसर्ग पसरवणारे आहे. 

Edited By Rajanand More

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in