नाशिकला भाजप- मनसे युती होऊ शकते का?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण नेत्यांच्या दौऱ्यांनी ढवळून निघण्यास सुरवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघेही आज नाशिक दौऱ्यावर आहे.
Raj Thakrey
Raj Thakrey

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण नेत्यांच्या दौऱ्यांनी ढवळून निघण्यास सुरवात झाली आहे. (Political situation is becoming hot due to Upcoming NMC Election) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State president Chandrakant Patil) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Suprimo Raj Thakre) दोघेही आज नाशिक दौऱ्यावर आहे. त्यांच्या दौऱ्याचा (On the tour of Nashik) परस्परांशी थेट काहीही संबंध नाही. मात्र यानिमित्ताने नाशिकला भाजप- मनसे युती होऊ शकते का? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका होतील की नाही, याबाबत अद्याप अस्पष्टता असली तरी भाजप व मनसेकडून महाविकास आघाडीला शह देण्याची तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने मुंबईत युती झाल्यास नाशिकमध्येही भाजप-मनसे युतीची दाट शक्यता असल्याने त्यादृष्टीनेही चाचपणीची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राज ठाकरे यांचा एकाच वेळी दौरा होत असल्याने त्या अनुषंगाने युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

एकेकाळी महापालिकेत सत्तेवर असलेले मनसेचे प्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार असून, संघटना बळकटीबरोबरच मनसेच्या सत्ताकाळात पूर्ण झालेल्या व नंतर वाताहात झालेल्या प्रकल्पांची ते पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसेच्या प्रकल्पांची एकीकडे पाहणी करणार असले तरी दुसरीकडे महापालिका निवडणुकीत भाजप युतीचीदेखील चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे. 

पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीचा नारळ फोडण्याचे काम सुरू आहे. शिवसेनेचे संपर्कनेते संजय राऊत दर महिन्याला नाशिकमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील संघटनात्मक बांधणीसाठी तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचादेखील दौरा शुक्रवारपासून सुरू होत आहे. शुक्रवारी उशिरा त्यांचे नाशिकमध्ये आगमन होईल. शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील. आगामी निवडणुकीत पक्षाची भूमिका आदींबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

एकेकाळी शहरात मनसेचे तीन आमदार व ४० नगरसेवक होते. जिल्हा परिषदेत चार सदस्य व पंचायत समितीदेखील मनसेच्या ताब्यात आल्याने मनसेचा गड होता. परंतु, कालांतराने पक्षाला घरघर लागली. पुढे एक-एक करत मनसचे नगरसेवक अन्य पक्षात प्रवेशकर्ते झाले. २०१७ च्या निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या पाचपर्यंत खाली घसरली. या पाच वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात ठोस अशी कामे न झाल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मनसेला पुन्हा कमान किंगमेकर म्हणून भूमिका बजावण्याची संधी असल्याने त्यादृष्टीने राज ठाकरे यांच्याकडून दौऱ्यात नियोजन होणार असल्याचे बोलले जात आहे. 
...

हेही वाचा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com