या कारणामुळेच त्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला

इतकेच नव्हे तर हे नगरसेवक नगराध्यक्षांकडे वारंवार पैशांची मागणी करायचे.
Those corporators joined Shiv Sena due to fear of disqualification action: Eknath Khadse
Those corporators joined Shiv Sena due to fear of disqualification action: Eknath Khadse

जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भारतीय जनता पक्षाच्या १३ आणि १ अपक्ष अशी १४ सदस्यसंख्या आहे. यापैकी दहा नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी काही प्रसार माध्यमांवर प्रसारित झाली आहे. परंतु आज केवळ भाजपचे चार व एक अपक्ष असे पाच नगरसेवकच शिवसेनेकडे गेल्याचे दिसून येत आहे, त्यापैकी भाजपची एक नगरसेविका ही चार अपत्ये असल्याच्या कारणाने अपात्र झालेली आहे, तर उर्वरित त्या तीन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होणार असल्याच्या भीतीपोटी तसेच त्यांच्या वरील अपात्रतेची कारवाई होऊ देणार नाही, अशी खात्री संबंधितांनी दिली असल्यामुळेच त्या नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या दहा  नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश ही बातमी दिशाभूल करणारी आहे, असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताईनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. (Those corporators joined Shiv Sena due to fear of disqualification action: Eknath Khadse)            

मुक्ताईनगर येथील भाजपच्या काही नगरसेवकांनी आज  मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केल्याची बातमी प्रसारित झाली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी खडसे फार्म हाऊसवर संध्याकाळी तत्काळ पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितले की मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये 13 भाजपचे व एक अपक्ष असे एकूण 14 नगरसेवक आहेत, त्यापैकी 10 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त हे खोटे व दिशाभूल करणारे आहे. कारण, माझ्यासोबत 9 नगरसेवक आता हजर असल्याची माहितीही माजी मंत्री खडसे यांनी दिली. 

या वेळी ते म्हणाले की मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणारे पाच नगरसेवक आहेत, त्यापैकी चार नगरसेवक हे भाजपचे असून त्यापैकी एक अपक्ष आहे. इतकेच नव्हे तर त्या चार भाजपच्या नगरसेवकांपैकी एक नगरसेविका अपात्र झालेली आहे. उर्वरित तीन भाजपचे नगरसेवक हे अतिक्रमण केल्यामुळे अपात्र होणार आहेत, त्याची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे एक जून रोजी होणार आहे. इतकेच नव्हे तर हे नगरसेवक नगराध्यक्षांकडे वारंवार पैशांची मागणी करायचे. त्यासोबतच एका नगरसेविकेच्या पतीने सणासाठी खुद्द माझ्याकडूनच दोन लाख रुपये घेतल्याची माहितीही खडसे यांनी या वेळी दिली. 

अपात्र होण्याच्या भीतीने व त्यांना अपात्रतेच्या कारवाईपासून वाचविण्याची खात्री संबंधितांनी दिल्यामुळेच त्या नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीवर कोणत्या प्रकारचा परिणाम होणार नसल्याचेही माजी मंत्री खडसे यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर मी राष्ट्रवादी पक्षातच असल्याचे ही सांगण्यास ते विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com