पूरग्रस्तांना मदतीऐवजी ठाकरे सरकारच्‍या हवेतच घोषणा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा करत आपला शब्द फिरविला. राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याऐवजी ठाकरे सरकार हवेत घोषणा करत आहे.
Ashish Shelar BJP
Ashish Shelar BJP

नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakre) यांनी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज (Announcement of 11,500 Cr. Package) देण्याची घोषणा करत आपला शब्द फिरविला. राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याऐवजी (Government should give aid to flood area People) ठाकरे सरकार हवेत घोषणा करत आहे, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी येथे मंगळवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत बोलताना केला. 

भाजपतर्फे राज्यभर संघटनात्मक कामासाठी आमदारांसोबत संवाद कार्यक्रम सुरू आहेत. त्यानिमित्त आमदार शेलार नंदुरबारला आले होते. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटनात्मक चर्चा व मार्गदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना आमदार शेलार म्हणाले, की राज्यात बिकट परिस्थिती असताना ठाकरे सरकार मंत्रालयापर्यंत पोचलेले नाही. त्यामुळे ते दुर्गम भागात काय पोचणार. नंदुरबार जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आहे. त्यात बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देत नाहीत. दुष्काळसदृश स्थिती असताना नंदुरबारचे पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

पूर्वतयारीची आढावा बैठक घेणे आवश्यक असतानाही पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दुर्लक्ष केले आहे. आदिवासी बांधवांना देण्यात आलेले खावटी किट निकृष्ट दर्जाचे आहे. लोकप्रिय सरकार असल्याचा ढोल वाजणारे नागरिकांसाठी कधी काम करतील, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक हे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

राज्यातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याऐवजी ठाकरे सरकार हवेत घोषणा करत आहे. गेल्या दीड वर्षात आघाडी सरकारने राज्यात टाळेबंदी केली. त्यांचे अनलॉकबाबतचे निर्बंध काय आहे, तेच कळत नाही. राज्यात सर्वाधिक कुपोषणाचा प्रश्‍न नंदुरबारमध्ये गंभीर असताना अधिवेशनात यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, आघाडी शासनाने तसे न करता समांतर विधानसभा चालविली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजपतर्फे प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. आमदार राजेश पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हाध्यक्ष श्री. चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्रकुमार गावित आदी उपस्थित होते.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com