Varun Sardesai
Varun Sardesai

युवा सेनेत बदल नाही; आदित्य ठाकरेच करणार नेतृत्व!

युवा सेना प्रमुख पदाच्या नेतृत्वात बदल होण्याच्या चर्चा निरर्थक आहेत. आदित्य ठाकरे हेच युवा सेना प्रमुख असतील, अशी माहिती युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव : युवा सेना प्रमुख पदाच्या नेतृत्वात बदल होण्याच्या चर्चा  निरर्थक आहेत. (Rumors of Change in yuva sena leadership is Pointless) आदित्य ठाकरे हेच युवा सेना प्रमुख असतील, (Aditya Thakre will continue as Yuva sena Chief) अशी माहिती युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

उत्तर महाराष्ट्र दौरा आज पासून जळगाव येथून सुरू झाला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, राज्यात युवा सेनेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ग्रामीण भागातही घरघरांत युवा सेना पोहोचली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना वाढते आहे. त्यामुळे आगामी काळातही त्यांच्याच नेतृत्वाखाली काम सुरू राहणार आहे.

`युवा स्किल`द्वारे रोजगार
कोरोना महामारीमुळे युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून `युवा स्किल` हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यातून युवकांना आय टी आय, तसेच संगणक व इतर विविध व्यावसायिक तंत्रांचे दोन महिन्यांचे डिप्लोमा कोर्स देऊन रोजगार उपलबध करून देण्यात येणार आहे.

कार्यकर्त्यांना संधी
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत तसेच विविध संमित्यावर काम करण्याची संधी देण्यात येत आहे. त्यातून विविध कार्यकर्ते, विद्यार्थी अतिशय चांगले काम करीत आहेत, असे सरदेसाई यांनी सांगितले.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com