भाजप नेत्यांनी आपल्याच पक्षाची बदनामी थांबवावी

नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या शहराध्यक्षांसह गटनेत्यांना अभय देत पक्षाची बदनामी थांबवून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला श्री. पाटील यांनी दिला.
Chandrakant Patil
Chandrakant Patil

नाशिक : काही दिवसांपासून सत्ताधारी भाजपमध्ये निर्माण झालेली बंडाळी, पक्षांतर्गत वाढलेली धुसफूस (There is a internal dispute in city BJP leaders) या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चार पदाधिकाऱ्यांची पुणे येथे बैठक घेतली. (State president Chandrakant Patil call 4 leaders in Pune) नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या शहराध्यक्षांसह गटनेत्यांना अभय देत (Chandrakant patil conserve city president)पक्षाची बदनामी थांबवून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला श्री. पाटील यांनी दिला. 

महापालिका निवडणुका जवळ येत असताना, महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वादाने कळस गाठला आहे. सभागृह नेता व गटनेत्यांची उचलबांगडी, पदाधिकाऱ्यांमधील वाद, गेल्या महिन्यात झालेल्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुणे येथे आमदार ॲड. राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शहराध्यक्ष गिरीश पालवे व माजी आमदार बाळासाहेब सानप यांना बोलावून घेतले. 

प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पंचवटीत बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र यांच्यासाठी ढिकले व गिते यांनी पुढाकार घेत उमेदवारी अर्ज माघारी घ्यावयास लावला. नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सानप यांनी पुढाकार घेऊन भाजप उमेदवाराला मदत करणे अपेक्षित होते. मात्र, सानपसमर्थक विशाल संगमनेरे व सीमा ताजणे यांनी दांडी मारल्याने शिवसेनेच्या पदरात आपसूक सभापतिपद पडले. 

भाजपमधील बंडाळी शिगेला पोचल्याचे स्पष्ट झाले. सानप यांच्यासह शहराध्यक्ष गिरीश पालवे व गटनेते अरुण पवार यांनी व्हीप न बजावल्याने त्यांची भूमिका संशयात सापडली. या पार्श्‍वभूमीवर कारवाईची मागणी होत होती. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामुळे कारवाईची शक्यता व्यक्त होत होती. श्री. पाटील यांनी पक्षाची बदनामी थांबविण्याचा सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

चौघांमध्ये निवडणुकीची चर्चा 
आगामी महापालिका निवडणुकीच्या चर्चेसाठी पुण्यात प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी बोलाविल्याचे सांगण्यात आले. मात्र, निवडणुकीची तयारी करायची, तर पक्षात अन्य प्रमुख पदाधिकारी व आमदार असताना, त्यांना का बोलाविले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत वादाने टोक गाठल्याने त्या पार्श्‍वभूमीवर बैठक बोलाविण्यात आल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या भूमिकेनंतर श्री. सानप, पालवे व पवार यांच्यावर कारवाई न करता त्यांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.  
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com