जिल्हा बँकेच्या निवडणूकीचा लांबलेला फड रंगणार!

या ना त्या कारणामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुकीचा लांबलेला फड वर्षानंतर पुन्हा रंगत येणार आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी ठरावाचा कार्यक्रम अर्ध्यावरच स्थगित झाला होता.
NDCC Bank
NDCC Bank

येवला : या ना त्या कारणामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुकीचा लांबलेला फड (NDCC bank election delayed due to various resons) वर्षानंतर पुन्हा रंगत येणार आहे. (Now process will begin again) फेब्रुवारीमध्ये निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी  ठरावाचा कार्यक्रम अर्ध्यावरच स्थगित झाला होता. (society resolution process will create political contention at Village level) कोरोनाचा जोर ओसरल्याने आहे तेथून निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात जिल्ह्याचे राजकारण पून्हा तापेल.

आमदार-खासदारांसह नेते जिल्हा बँकेत प्रवेशासाठी साम-दाम वापरतात. सोसायटी गटात तर लाखो रुपयांची उलाढाल होते, यामुळे जिल्हा बँक निवडणूक  राजकीय क्षेत्रातील सगळ्यांचे लक्ष वेधून घेते. गत वर्षी मतदार यादीसाठी संस्था प्रतिनिधीचे ठराव मागविण्यात आले होते. परंतु कोरोणामुळे ही प्रक्रिया अर्धवट राहील्याने पुन्हा या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ठराव मागविण्यात आले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत सहकारी संस्थांच्या प्रतिनीधीचे ठराव सहायक निबंधकांकडे द्यायचे होते. २ मार्चला जिल्हा बँक प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणार होती. त्यामुळे ठराव करण्यासाठी गावचे राजकारण देखील तापले होते. परंतु तिसऱ्या लाटेची चाहूल लागताच सहकार विभागाने निवडणूक प्रक्रिया स्थगित केली.  पुढे ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. ठरावांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेत्यांनी आडाखे बांधण्यास सुरवात केली. 

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपली. सध्या बँकेवर प्रशासक आहे. यापूर्वी दोनदा निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली होती. या दरम्यान गावांच्या विविध कार्यकारी सोसायटीसह इतर संस्थांचेही अर्थकारण व राजकारण बदलले. लांबलेल्या निवडणुकीसाठी संस्था सभासदांचे ठराव मार्च महिन्यात मागविण्याचा कार्यक्रम विभागीय सहनिबंधकांनी जाहीर केला. सहकारी संस्थांमध्ये मतदानाच्या ठरावाची प्रक्रिया गतिमान झाली झाली आहे. अनेक ठरावही जमा झाले आहेत. आता पुन्हा ही प्रक्रिया पुढे सलगपणे राबवली जाणार आहे.

स्थगिती उठवली
राज्यातील सर्वच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपून पंधरा महिन्याचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागणार आहे, हे स्पष्ट करीत सोमवारी सहकार विभागाने निवडणुकीची स्थगिती उठवली आहे. यापूर्वी दाखल झालेले ठराव विचारात घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे. त्या टप्प्यावर प्रक्रीया पुढे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या पूर्वीचे ठराव गृहीत धरले जाणार आहेत. 

मात्र अजून काही संस्थाचे ठराव राहिले, त्यांना संधी मिळेल की नाही किंवा ठरावासाठी अजून वेगळे निकष लावले जातील का याबाबत मात्र सहकार विभागाच्या सूचनेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक कार्यक्रमाची तयारी सुरू झाल्याने इच्छुकांसह मतदार देखील आत्तापासूनच तयारीला लागले असल्याने पुन्हा एकदा थंडावलेले जिल्ह्याचे राजकारण तापणार हे मात्र नक्की!

१९ मे २०१५ रोजी बँकेची निवडणूक झाली होती.त्यानंतर नोटाबंदीने बँकेची तिजोरी खिळखीळी केली होती.पण आता काही प्रमाणात बँक रुळावर येत असल्याने जिल्ह्यातील बड्या हस्ती संचालक होण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहे. संचालकपदी खासदार आमदारांसह सर्व प्रमुख नेतेच विजयी होत असल्यामुळे या बँकेकडे विशेष लक्ष असते.

सोसायटी गट लक्षवेधी
जिल्हा बँकेसाठी एक हजार ४६ विविध कार्यकारी संस्था सोसायट्या,पात्र इतर संस्था,तसेच वैयक्तिक सभासद असून १० हजारांच्या आसपास संस्था मतदानास पात्र राहु शकतात. मतदानासाठी संस्थेच्या प्रतिनिधीचा ठराव केले की तेच मतदार असतात.सोसायटी गटातून प्रत्येक तालुक्यातून एक संचालक पाठविला जातो,त्यांना तालुक्यातील मतदारांचे मते असल्याने सोसायटी गटासह इतर गटातून मते मिळतील अशा जवळच्या व्यक्तीचे ठराव फिल्डिंग लावून  केले गेले आहे.आता पुन्हा सोसायटीवर सत्ता असलेल्या पॅनल प्रमुखासह संचालकांना व ठराव केलेल्या प्रतिनिधीला विश्वासात घेऊन इच्छूक नेते आताच सावध पवित्रा घेत आहेत.
बँकेच्या अशा आहेत जागा..!

जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या २१ जागा आहेत. यात विविध कार्यकारी संस्था (सोसायटी) गटांतून प्रत्येकी एक याप्रमाणे १५ तालुक्याचे प्रतिनिधी. हौसिंग सोसायटी, नागरी बँका, बिगरशेती पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, मजूर संस्था, खरेदी- विक्री संघ, दूध संघ, वैयक्तिक सभासद, कुक्कुटपालन व इतर संस्था याचा प्रत्येकी १ प्रतिनिधी, तसेच राखीव गटातून ५ प्रतिनिधी निवडून येत असतात. यात महिला प्रतिनिधीकरिता २, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील सदस्य १, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गातील सदस्य १, इतर मागासवर्गातील सदस्य (ओबीसी) १ जागा असते.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com