जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हॉकी खेळायचा मोह होतो!

महाराष्ट्र पोलिस अकादमीतील आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार तयार केलेले कृत्रिम हिरवळीचे हॉकीचे मैदान पाहिल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही बालपणात हरवून गेले. व्यासपिठावर बोलतांना त्यांनीच, सिंथेटीक मैदान पाहून मला हॉकी खेळण्याचा मोह झाला.
Uddhav Thakre
Uddhav Thakre

नाशिक : महाराष्ट्र पोलिस अकादमीतील आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार तयार केलेले कृत्रिम हिरवळीचे हॉकीचे मैदान (Synthetic track hockey ground in Maharashtra police acadamy) पाहिल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही बालपणात हरवून गेले. (CM Uddhav thakre also recall his childhood days) व्यासपिठावर बोलतांना त्यांनीच, सिंथेटीक मैदान पाहून मला हॉकी खेळण्याचा मोह झाला. (He said i infatuate to play hocky for some seconds) पण आता काय हॉकी खेळणार. आता फक्त उद्घाटने करावी लागतात, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. 

येथील नाशिक त्र्यंबक मार्गावरील महाराष्ट्र पोलिस अकादमीत आज श्री ठाकरे यांच्या हस्ते सिंथेटीक ट्रॅक, हॉकी मैदानासह पाच मैदानाचे उध्दाटन झाले. यावेळी श्री ठाकरे बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक संजय पांडे, अप्पर संजय कुमार, पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या संचालक आश्वती दोर्जे, पोलिस आयुक्त दीपक पांडे यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते डिसेंबर २०१९ मध्ये या कामांचे भूमीपूजन झाले होते. दोन वर्षात कोरोना प्रतिबंध असताना  आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार तसेच ऑलिम्पीक फेडरेशनच्या मान्यतेप्रमाणे ही क्रिडांगणे तयार झाली. त्याविषयी अप्रतिम अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना मांडल्या. हॉकी आणि ॲथेलॅटीक्सची मैदाने शजारी होती. दोन्ही मैदानावरील कृत्रिम हिरवळ (सिंथेटीक ट्रॅक) धावण्याला वेगाला गती देणारे सिंथेटीक ट्रॅक वातावरणातील गारवा अशा वातावरणात खेळण्याचा मोह झालेल्या मुख्यमंत्र्यांनी खेळण्याची आणि धावण्याचा मोह झाल्याचे त्यांनी सांगितले. 
कोरोनामुळे मास्क घालून फिरतांना होत असलेल्या कोंडमाऱ्याची मला जाणीव आहे. ते म्हणाले दीड वर्षापासून मास्क लावून फिरतोय. आज बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून मी मोकळा श्वास घेत आहे. 

आमदार व्यासपिठावरुन खाली 
पोलिस प्रशिक्षण केंद्रातील या कार्यक्रमात प्रोटोकॉल नुसार, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, वनमंत्री हे चार मंत्री आणि पोलिस महासंचालक, अप्पर महासंचालक, अकादमीचे संचालक आणि पोलिस आयुक्त हे चार आधिकारी अशा केवळ आठ खुर्च्याची मांडणी केली होती. त्यामुळे आमदार, खासदारांची व्यवस्था व्यासपीठावर नव्हती. मंत्र्यासोबत असलेले आमदार दिलीप बनकर मंत्र्यासोबत थेट व्यासपिठावर जाउन बसले. त्यामुळे पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी आमदार बनकर यांना कानात ही बाब लक्षात आणून दिल्यावर आमदार साहेब व्यासपिठावरुन खाली आले. 
 ...
हेही वाचा....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com