मुंबई, पुणे, नाशिक Level 3 मध्ये : सर्वच दुकाने खुली, स्पा, जिम, हाॅटेल 50 टक्के क्षमतेने

काही निर्बंध आणखी काही दिवसकायम राहणार
3lc_0.jpg
3lc_0.jpg

पुणे  :  राज्य सरकारने कोरोनाच्या पॅाझिटिव्हीटी रेटनुसार विविध जिल्हे आणि शहरे यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार लॅाकडाऊनचे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गट १ ते गट ५ (लेव्हल) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक ही प्रमुख शहरे लेव्हल तीनमध्ये आल्याने तेथील काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या शहरांतील महापालिकांना तसे स्वतंत्रपणे आदेश जारी आज सायंकाळी जारी केले आहेत. त्यात अत्यावश्यक दुकानांच्या वेळा वाढल्या आहेत. आवश्यक नसलेली दुकाने, हाॅटेल, जिम, स्पा सुरू होणार आहेत. येत्या सोमवारपासून (ता. सात जून) त्याची अंमलबजावणी सुरू होईल. (New regulations for breaking the chain in Mumbai, Pune and Nashik to be implement from June, 7)

गट १ (लेव्हल १) मध्ये असलेल्या 18 जिल्ह्यांत जवळपास सर्वच बाबी खुल्या करण्यात आल्या आहेत.  तर गट २ आणि गट ३ मध्ये मात्र काही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नाशिक हे प्रमुख शहरे गट ३ (लेव्हल ३)  मध्ये आहेत.

पुण्याच्या पॅाझिटिव्हीटी रेट हा ५.९ तर मुंबईचा ५. ३० आहे. आँक्सिजन बेडच्या एकूण क्षमतेपैकी मुंबईत ३५ टक्के, पुण्यात २६ टक्के बेड भरलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रमुख शहरांचा समावेश गट ३ (लेव्हल ३) मध्ये आहे. पाॅझिटिव्हीटी रेट हा पाचपेक्षा कमी आणि आॅक्सिजन बेडवरील रुग्ण क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी असतील तर अशा जिल्ह्यांचा समावेश लेव्हल एकमध्ये होतो. 

पाॅझिटिव्हिटी रेट मध्ये वेळोवेळी होणारे बदल तसेच मागील वर्षी निर्बंध शिथिल झाल्यानंतर तातडीने वाढलेली रुग्ण संख्या या सर्व बाबींचा सारासार विचार करून नाशिकमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लेवल 3 प्रमाणे निर्बंध ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये लेव्हल 2 नुसार परिस्थिती असली तरी तेथे लेव्हल 3 नुसार सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला.   

याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरात आता पॅाझिटिव्हीटी रेट हा पुढील दोन दिवसात आणखी कमी होईल. मात्र, तरी काही निर्बंध कायम ठेवण्याची गरज आहे. सर्व जर  एकदम खुले केले तर पॅाझिटिव्हीटी रेट पुन्हा वाढू शकतो.

पुणे शहरातील विविध रुग्णालयात इतर जिल्ह्यातील रुग्ण आँक्सिजन बेडवर आहेत. त्यामुळे पुण्यातील आँक्सिजन बेड जास्त व्यापलेले आहेत. पुणे जिल्ह्याचा (पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण) एकत्रित विचार केला तर पुणे जिल्हा गट ४ मध्ये मोडतो. मात्र, पुणे शहराचा आढावा घेतला तर पुणे शहर गट ३ मध्ये मोडते. 

मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये पुढील सेवा सुरू राहणार....

  1. -अत्यावश्यक सेवेसह सर्व दुकाने सांयकाळी चार वाजेपर्यंत. आवश्यक नसलेल्या वस्तूंचीही दुकाने आठवडाभर सायंकाळी चार वाजेपर्यंत
  2. - मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
  3. - हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत खुली रहातील. 4 नंतर पार्सल सेवा सुरू राहील.
  4. - सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक रोज सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू राहतील
  5. - खासगी आणि सरकारी कार्यालये (50  टक्के उपस्थिती) संध्याकाळी चारपर्यंत सुरू राहतील
  6. - इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील. आऊटडोअर सकाळी पाच ते नऊ, संध्याकाळी 6 ते 9
  7. - सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओमध्ये परवानगी असेल
  8. - सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने.(शनिवार व रविवारी बंद)
  9. -लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर शासकीय बैठका क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील
  10. -वास्वव्यास मजूर असलेल्या ठिकाणी बांधकामाला सायंकाळी चारपर्य़ंत मंजुरी
  11. -ई काॅमर्स, साहित्य सेवा पुरवठा नियमितपणे सुरू राहतील.
  12. - जिम, सलून, ब्यूटी पार्लर, वेलनेस स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी. संध्याकाळी चारपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा. एसीची परवानगी नाही.
  13. -उत्पादन ठिकाणे नियमितपणे सुरू राहणार..
  14. -संध्याकाळी पाचपर्य़ंत जमावबंदी. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी
  15. सार्वजनिक वाहतूक नियमित सुरू राहणार. मुंबईतील लोकलसेवा अत्यावश्यक सेवा वगळता बंद
  16. मालवाहतूक नियमित. आंतरजिल्हा, खासगी कार, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या नियमित. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com