पुणे, मुंबईसह वीस जिल्ह्यांतील लाॅकडाऊन शिथिल : हाॅटेल, माॅल, दुकाने सुरू होणार

गेले दोन दिवस या नियमावलीवरून चर्चा सुरू होती...
lokcdown pune.
lokcdown pune.

मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या राज्यात कमी होऊ लागल्याने जनतेला लाॅकडाऊन शिथिल होण्याची अपेक्षा होती. ती आता लवकरच पूर्ण होणार असून येत्या सात जूनपासूनच लाॅकडाऊन शिथिल होणार आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी `तत्वतः` सांगितलेले सूत्र राज्य सरकारने अधिकृतरित्या जाहीर केले. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता मुख्य सचिवांनी यासाठीचे आदेश जारी केले. (Maharashta Govt issues new guidelines for breaking the chain)

मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर  या महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय युनिट समजण्यात येतील. याचा अर्थ तेथील महापालिका प्रशासन शहरासाठी आणि जिल्हा प्रशासन ग्रामीण भागासाठी वेगळी नियमावली काढू शकतील. आंतरजिल्हा प्रवासबंदी काही निर्बंधासह खुली करण्यात आली आहे. 

पाॅझिटिव्हिटी रेट हा पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट आहे आणि जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले आहेत तेथील सर्व व्यवहार खुले करण्यात येतील. हा पहिला गट मानला जाईल. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काही सेवांवरील निर्बंध वगळता (उदा.बससेवा) पूर्णतः रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत. कार्यालयीन सेवाही शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दुसरा गट

मुंबई शहर हे दुसऱ्या गटाध्ये आहे. त्यामुळे लोकल आणि बससेवा वगळता सर्व (माॅल, रेस्टाॅरंटसह) खुले होणार आहे.  अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार, या जिल्ह्यांचा समावेश आहे.

50 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील
- मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के सुरू राहतील
- सार्वजनिक जागा , मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील
- बांधकाम क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील
- कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील
- ई सेवा पूर्ण सुरू राहील
- जिम, सलून, स्पा,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील

तिसरा गट

या गटात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे.

अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील
- मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
- हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरू राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरू रहातील
- खासगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहील
- इनडोअर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील
- सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल
- सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार)
-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील
- कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील
- दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल

चौथा

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याचा समावेश आहे. (पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर यात येत नाही.)

- अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
- अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील
- सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
- हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
- सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
- अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील
- शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
- स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
- कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही
- लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यसंस्कारसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक
- राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील
- ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील
- कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
- ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
-सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
- बसेस 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
- संचारबंदीचे नियम लागू राहतील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com