टिपू सुलतान नामकरणावरून शिवसेना- भाजपमध्ये वादंग - Controversy on Tipu Sultan naming issue, Mumbai Politics | Politics Marathi News - Sarkarnama

टिपू सुलतान नामकरणावरून शिवसेना- भाजपमध्ये वादंग

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 जुलै 2021

महापालिका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास आडकाठी करणाऱ्या भाजपने २०१३ मध्ये रस्त्याचे नाव टिपू सुलतान करताना विरोध केला नव्हता, असा दावा करत संबंधित प्रस्तावाची कागदपत्रेच महापौरांनी प्रसिद्ध केली होती.
 

मुंबई : महापालिका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यास आडकाठी (Bjp oppose naming of Tipu Sultan) करणाऱ्या भाजपने २०१३ मध्ये रस्त्याचे नाव टिपू सुलतान करताना विरोध केला नव्हता, (But 2013 BJP does not oppose the Tipu Sultam naming praposal) असा दावा करत संबंधित प्रस्तावाची कागदपत्रेच महापौरांनी प्रसिद्ध केली होती. 

या कागदपत्रांमध्ये भाजपचे तत्कालीन नगरसेवक, आमदार अमित साटम अनुमोदक असल्याचा दावा केला होता. मात्र, ही कागदपत्रे बनावट आहेत. स्थापत्य समितीत रस्त्याच्या नामकरणाला भाजप नगरसेवक अनुमोदक असल्याचे सिद्ध करावे; अन्यथा ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करू, असा इशारा साटम यांनी दिला.

गोवंडीतील उद्यानाचे नामकरण टिपू सुलतान करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीत सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी भाजपच्या सदस्यांनी केली; तर अध्यक्षांनी हा प्रस्ताव राखून ठेवला. त्यावर भाजप सदस्यांनी महापौरांची भेट घेऊन प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती.

शुक्रवारी महापौरांनी पत्रकार परिषदेत भाजप या मुद्द्यावर राजकरण करीत असल्याचे म्हटले. डिसेंबर २०१३ मध्ये स्थापत्य समितीत (उपनगरे) या रस्त्याला टिपू सुलतान नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्या वेळी भाजपचे सदस्य उपस्थित होते, असा दावा महापौरांनी केला होता. त्यानंतर काही कागदपत्रेही सादर केली होती. त्यात, अनुमोदक म्हणून साटम यांचे नाव नमूद करण्यात आले आहे.

यावरून शनिवारी साटम यांनी महापौरांवर तोफ डागली आहे. ‘आपण कधीही स्थापत्य समितीचे सदस्य नव्हतो. महापौर खोटी कागदपत्रे सादर करीत आहेत. महापौरांनी केलेले आरोप सिद्ध करावेत; अथवा त्यांच्यावर ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करू, असा इशारा त्यांनी दिला.
...
हेही वाचा...

शिवसेनेची `शिवसंपर्क` अभियानातून निवडणुकीची तयारी

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख