शिवसेनेची 'शिवसंपर्क' अभियानातून निवडणुकीची तयारी  

नेतृत्व गुण निर्माण करण्याची ताकत ही फक्त शिवसेनेच्या विचारात आहे.
  Prataprao Jadhav .jpg
Prataprao Jadhav .jpg

सिंदखेड राजा : अगामी महापालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरु केले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने केलेले कार्य घराघरांत पोहोचवून शिवसंपर्क अभियान यशस्वीपणे राबवावे असे आवाहन बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. (Shiv Sena MP Prataprao Jadhav started the Shiv Sampark Abhiyan) 

त्यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगांव येथून शनिवारी शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, युवासेना प्रमुख ऋषी जाधव, शिवसेना नेते छगन मेहेत्रे, देविदास ठाकरे, श्रीनिवास खेडेकर, नगराध्यक्ष सतीश तायडे, बाबुराव मोरे, महेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष शिवकुमार ठाकरे, वैभव देशमुख, सरपंच जनार्धन मोगल, राजेंद्र आढाव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.  

यावेळी जाधव म्हणाले की ''नेतृत्व गुण निर्माण करण्याची ताकत ही फक्त शिवसेनेच्या विचारात आहे. शिवसेना हा तरुणांचा पक्ष आहे, तरुणांच्या रक्तामध्ये विचार रुजविण्याचे काम बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्यावेळी केले होते. तेच काम आज पर्यंत सुरू आहे. शिवसेना पक्षाने सर्वसामान्य माणसाला राजकारणातील मोठी पदे देण्याचे काम केले आहे, त्यामुळे पक्षात निष्ठेने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

शिवसेना पक्षाने खरे नेतृत्व तयार करण्याचे काम केले आहे, सर्वसामान्य माणसाला नेता बनविण्याचे काम केले आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, यासह अनेक पक्षात अनेक नेते शिवसेना पक्षातून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शिवसैनिक ही पदवी दिली आहे, त्यांचे कारण म्हणजे सैनिक हा २४ तास अलट असतो, सैनिक हा तत्पर असतो, वरीष्ठांचा आदेश आला तर सर्व गोष्टी साठी सैनिक तयार असतो. बाळासाहेब नेहमी सांगायचे पदे येतात पदे जातात शिवसेनेमध्ये सर्वात महत्वाचे पद म्हणजे शिवसैनिक आहे.

शिवसैनिकांच्या भरवण्यावरच शिवसेना महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष आहे. शिवसेनेचे ताकत दिवसेंदिवस वाढत आहे शिवसैनिक जास्त बोलत नाही परंतु काम करून दाखवतो जशाला तसे वागण्याची पद्धत शिवसेना पक्षांमध्ये आहे. भविष्यात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणायचे आहे. याचे नियोजन आजपासून करणे आवश्यक, असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com