मुख्यमंत्री म्हणाले, `पुणे असो वा नाशिक, पाहुणा मात्र मुंबईचाच लागतो`

`भुजबळ साहेब, प्रकल्प पुण्याचा असो वा नाशिकचा. उद्घाटनाला पाहुणा मात्र मुंबईचाच लागतो` या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पालकमंत्री छगन भुजबळ यांना चिमटा घेतला. त्यावर पुढे शिस्तबद्ध पोलिस असले तरी, त्यांना आपले हसु आवरता आले नाही.
Uddhav Thakre f
Uddhav Thakre f

नाशिक : `भुजबळ साहेब, प्रकल्प पुण्याचा असो वा नाशिकचा. उद्घाटनाला पाहुणा मात्र मुंबईचाच लागतो` (Mr Bhujbal project may be of pune or Nashik, but guest always of Mumbai) या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनी आज पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना चिमटा घेतला. त्यावर पुढे शिस्तबद्ध पोलिस असले तरी, त्यांना आपले हसु आवरता आले नाही. 

या विधानाला संदर्भ होता, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा. वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र पोलिस अकादमीला 115 वर्षाचा इतिहास आहे. हे स्कूल आधी पुण्याला होते. त्यानंतर ते नाशिकते हलविले असे सांगतिले. त्यावर भुजबळ यांनी हा धागा पकडत, आज असा प्रकल्प अन्य शहरात हलविणे अवघड आहे. असे म्हटले होते. 

मुख्यमंत्र्यांनी हाच संदर्भ पकडून, प्रकल्प पुण्याचा असो वा नाशिकचा. उद्घाटनाला पाहुणा मात्र मुंबईचाच लागतो, असे मिश्कील उत्तर देत चिमटा काढला.  

नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आदींसह अकादमीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात नाशिकमधील काम उत्तम होते. मी सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच मास्क काढलाय. मास्क काढून मोकळ्या वातावरणातील हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. मी सर्व नियमांचे पालन केले आहे. तुम्हीही काळजी घ्या. 

ते पुढे म्हणाले, खरे तर मी या कार्यक्रमाचे उद्घाटन आभासी पद्धतीनेच करणार होतो. माक्त्र दोन दिवसांपूर्वी येथील प्रमुखांनी मला लॅपटाॅपवर सादरीकरण दाखविले. ते पाहून मला रहावले नाही. गेल्या वर्षी मुख्यमंत्री झाल्यावर माझा पहिला कार्यक्रम इथेच होता. त्यात सादरीकरणात जे चित्र दाखवल ते उत्तम होते. नकाशाही उत्तम दाखवला जातो. मात्र प्रत्यक्ष काम तसे होत नाही. वेळेत झालेले नसते. मात्र अकादमीतील कामे अगदी जशी दाखवली तशीच झाली. ती देखील कोरोनाचे नियम पाळून. त्याचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. 

महाराष्ट्र पोलिस अकादमीचे कार्य नेहमीच उत्कृष्ट राहिलेले आहे. गुन्ह्यांचे स्वरुप आणि प्रकार बदलत असल्याने आता त्यानुसार पोलिसांनाही बदलावे लागेल. निदान पोलिसांना तरी यावेसे वाटेल, अशा स्वरुपाच्या पोलीस स्टेशन्सच्या निर्मितीची गरज आहे, असे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. पोलीस अकादमीसाठी आवश्यक सुविधांसाठी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्दही त्यांनी दिला.
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com