सुधीर मुनगंटीवार यांचा तो सल्ला उद्धव ठाकरे मानणार का? 

राज्य करण्याची तुमच्यामध्ये शक्तीही नाही.
Sudhir Mungantiwar criticizes maha vikas agadi leaders over allegations against IPS officers
Sudhir Mungantiwar criticizes maha vikas agadi leaders over allegations against IPS officers

मुंबई : "राज्यातील आयपीएस अधिकारी जर भारतीय जनता पक्षालाच माहिती देतात, असं तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही तर राज्य करण्याच्या लायकीचेच नाहीत,'' अशा शब्दांत राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शरसंधान साधले. तसेच, ""तुमच्या विरोधात भूमिका घेणारे असे जे अधिकारी आहेत, ते मोडून काढायला पाहिजे,'' असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिला. 

भारतीय जनता पक्षाकडून आयपीएस अधिकाऱ्यांचा वापर केला जात आहे, असा आरोप सत्तारुढ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे, असा प्रश्‍न ज्येष्ठ नेते मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले. 

माजी वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, "जेव्हा स्वतःची चोरी पकडली जाते. जेव्हा अशा पद्धतीने शपथपत्र, ऍफिडेव्हीट बाहेर येतं. एखादं पत्र बाहेर येतं. तेव्हाच तुम्हाला हे सर्व आठवतं का? आयपीएस अधिकारी जर भारतीय जनता पक्षालाच माहिती देतात, असं तुम्हाला वाटत असेल, तर मग तुम्ही तर राज्य करण्याच्या लायकीचेच नाही. राज्यातील अधिकाऱ्यांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम भावना नाही. तुमच्या विरोधात ते भूमिका घेतात, तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार राहिलेला नाही आणि राज्य करण्याची तुमच्यामध्ये शक्तीही नाही.'' 

"तुमच्या विरोधात भूमिका घेणारे असे जे अधिकारी आहेत, त्यांना मोडून काढायला पाहिजे. पण, तुमची तक्रार केल्यानंतर त्यांचा कुठेतरी संबंध आहे. ते कुठेतरी पे रोलवर आहेत, असा आरोप करणे चुकीचे आहे. पण, तुम्ही कोणाच्या पे रोलवर आहात?'' असा सवालही मुनगंटीवार यांनी विरोधकांना विचारला. 

अधिकाऱ्यांबाबत अशा शब्दांचा उपयोग करून राज्यातील प्रशासनाविषयी शंका निर्माण करणे. या पेक्षा राज्यकर्ता म्हणून कोणतीही गंभीर गोष्ट असू शकत नाही. असे जर कोणी आयपीएस अधिकारी असतील तर 1 लाख 44 हजार कोटी रुपये तुम्ही वेतन, पगार, पेन्शनवर खर्च करतो. तुमच्या अखत्यारित असलेल्या गुप्तचर विभागाला ही गोष्ट समजलीच नाही का? असेही भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com