फडणवीस मुख्यमंत्री असताना नाना पटोलेंचा फोन टॅप; अमजद खान नावाने घेतली परवानगी - Nana Patoles phone was claimed to have been tapped | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस मुख्यमंत्री असताना नाना पटोलेंचा फोन टॅप; अमजद खान नावाने घेतली परवानगी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 14 मे 2021

राज्यात रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या अहवालाचा मुद्दा गाजत आहे.

मुंबई : राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या अहवालाचा मुद्दा गाजत असतानाच फोन टॅपिंगचे आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०१६-१७ मध्ये फोन टॅप झाल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फोन टॅपिंगसाठी अमजद खान नावाने शासनाची परवानगी घेण्यात आल्याचे समजते. त्यावरून आता राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. (Nana Patoles phone was claimed to have been tapped)

फोन टॅपिंगबाबत नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समजलं मला समजले की, २०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप झाला होता. त्यासाठी अमजद खान या नावाने शासनाकडून परवानगी घेण्यात आली. माझा नार्कोटिक्सशी संबंध असल्याचे दाखवण्यात आले होते. या काळात मला समजलेल्या माहितीनुसार आएएस, आयपीएस अधिकारी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांचे फोनही टॅप झाले होते. याची दखल शासनाने घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. महाराष्ट्रासारख्या राज्यात व्यक्ती स्वातंत्र्याला अडचण येता कामा नये, असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा : लस खरेदीच्या ग्लोबल टेंडरवरून अजित पवारांनी भाजप नेत्यांना सुनावलं

काय आहे फोन अहवाल प्रकरण?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले होते. तसेच हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडेही दिला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार केला होता. रश्मी शुल्का यांनी महाराष्ट्र सरकार स्थापन करताना निर्माण झालेल्या संकटावेळी बेकायदेशीरपणे महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. हा अहवाल सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. त्यामध्ये अनेक बड्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आहेत. 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी काम करणारे एक रॅकेट मंत्र्यांचे नाव वापरते आहे. बदल्यांबाबत पोलिसांबरोबर थेट बोलणे होत आहे, अशी माहिती शुक्ला यांना मिळाली होती. कॅाल रेकॅार्डिंग सुरु झाले त्यावेळी स्फोटक माहिती समोर आली. या साऱ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल शुक्ला यांनी २५ आॅगस्ट २०२० रोजी महासंचालकांना दिला, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली होता. 

फडणवीस यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगेच पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पलटवार केला. फोन टॅपिंगसाठी त्यांनी कोणतीही परवानगी न घेता ३० लोकांचे फोन टॅप करत होत्या. त्यांनी महाराष्ट्रात सरकार बनविण्याचे संकट असताना त्यांनी सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करत होत्या. भाजपच्या एजंट म्हणून काम करताना त्यांना फोन टॅपिंगची सवय झाली होती. त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून इतर पदावर नियुक्ती करण्यात आली. दिल्लीत गेले दोन अधिकारी त्याकाळात भाजपसाठी काम करत होते, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला होता.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख