शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणतात... - It is not wise to comment on Shiv Sena-NCP alliance right now : Praful Patel | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याबाबत प्रफुल्ल पटेल म्हणतात...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 19 जून 2021

युती आणि आघाडीसंदर्भातील निर्णय हा २०२३ नंतर होतील.

नागपूर  ः राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत. त्याअगोदरच आघाडी आणि युतीबाबत भाष्य करणे, हे काय शहाणपणाचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविण्याच्या चर्चेवर मत व्यक्त केले. (It is not wise to comment on Shiv Sena-NCP alliance right now : Praful Patel) 

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढणार असल्याची चर्चा आहे. ‘सामना’मधून त्याबाबत छापून आले आहे, असा प्रश्न खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला होता. त्यावर पटेल यांनी वरील उत्तर दिले. ते नागपूरमध्ये बोलत होते. 

हेही वाचा : भाजपने निलंबित केलेल्या सुरेश पाटलांचा शिवसेनेने भगवा फेटा बांधून केला सत्कार

राज्यात काँग्रेस पक्ष हा आगामी निवडणुका ह्या स्वबळावर लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षात एकत्र निवडणुका लढविण्यावरून चर्चा सुरू झाली आहे. महाआघाडीतील उर्वरीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढवतील, असे भाष्य सामनातून करण्यात आले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही त्याबाबत भाष्य केलेले आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या नव्या संभाव्य निवडणूक युतीची चर्चा रंगली आहे.

त्याच संदर्भ घेऊन राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य पटेल यांना नागपुरात प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी निवडणुकीला तीन वर्षे असताना एकत्र निवडणूक लढविण्यावी भाष्य करणे शहाणपणाचे नाही, असे म्हटले आहे. 

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनीही म्हटले आहे की, युती आणि आघाडीसंदर्भातील निर्णय हा २०२३ नंतर होतील. त्यामुळेच मी म्हणतोय की युती आणि आघाडी याबाबत आज भाष्य करणे योग्य नाही.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे म्हटले हेाते, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांना चिमटा काढला होता. मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करणे, यात काहीही गैर नाही. मात्र, त्याबाबत लागणारा १४५ आमदारांचा आकडा जवळ असणे गरजेचे आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी पटोले यांच्या इच्छेवर मत व्यक्त केले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख