वडेट्टीवार, थोडी वाट पाहा; तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे  - Balasaheb Thorat's advice to Vijay Vadettiwar, who is unhappy with not getting the post of Revenue Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

वडेट्टीवार, थोडी वाट पाहा; तुम्हाला मोठी संधी मिळणार आहे 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 28 जून 2021

बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

मुंबई : मी विरोधी पक्षनेता होतो, त्यामुळे मला वाटलं होतं की, महसूलसारखे महत्वाचे खाते मिळेल. पण, मिळाले ओबीसी मंत्रालय, अशी जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘‘विजय वडेट्टीवार यांचे वय पाहता खूप मोठी संधी त्यांना पुढच्या काळात मिळणार आहे. त्यासाठी त्यांना कदाचित थोडीशी वाट पाहावी लागेल. परंतु पुढच्या काळात नक्कीच मोठ्या संधी येणार आहेत,’’ असे थोरात यांनी म्हटले आहे. (Balasaheb Thorat's advice to Vijay Vadettiwar, who is unhappy with not getting the post of Revenue Minister)

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यभरातील ओबीसीच्या वतीने आरक्षण टिकविण्यासाठी विविध मार्गाने लढा उभारला जात आहे. लोणावळा येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले हेाते. त्यावेळी वडेट्टीवार यांनी आपल्यावरील अन्याय बोलून दाखवला होता. त्यावर काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : नाशिकच्या अतिरिक्त SP शर्मिष्ठा यांची धडाकेबाज कारवाई : सांगलीकर म्हणाले सलाम तुमच्या कर्तृत्वाला

थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. विजय वडेट्टीवार यांचे वय पाहता तयांना पुढील काळात खूप मोठी संधी मिळणार आहे. कदाचित त्यासाठी त्यांना थोडी वाट पाहवी लागणार आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?

जेव्हापासून मी ओबीसींचा लढा सुरू केला आहे, त्यानंतर मला धमक्या येत आहेत. पण धमक्या कोण देत आहे, हे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे वडेट्टीवारांना धमक्या देतंय कोण, हा प्रश्न चर्चेत आला आहे. वडेट्टीवार म्हणाले, मी ओबीसी मंत्रालयासाठी पैसा मागितला, तर आपलंच सरकार म्हणतं पैसा नाही. आपण एकत्र नसल्यामुळे ही स्थिती झाली आहे. मी विरोधी पक्षनेता होतो, त्यामुळे मला वाटलं होतं की, महसूलसारखे महत्वाचे खाते मिळेल, पण मिळाले ओबीसी मंत्रालय. पंकजाताई तुम्हाला मिळाले ग्रामविकास, तुम्हाला तर त्यापेक्षाही मोठे खाते मिळायला पाहिजे होते. पण, तसे घडले नाही. कारण ओबीसींची ताकद आपण आजवर दाखवलीच नाही. पण आता आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. ओबीसी खाते सांभाळताना माझ्या समाजावर अन्याय होतो आहे, म्हणून मी लढायला समोर आलो आहे आणि ही लढाई लढताना प्रसंगी मंत्रिपदही पणाला लावेन, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मला बावनकुळेंची काळजी 

आता आपल्याला पुढे काम करायचे आहे. मागे काय झाले ते सोडून द्यावे लागेल. ही काही सोपी लढाई नाही. ही प्रस्थापितांच्या विरोधातील लढाई आहे. मला भिती नाही, कारण माझा नेताच ओबीसी आहे. काळजी आहे ती बावनकुळे साहेबांची. समाजासाठी काम करताना पक्ष नाही, मंत्रिपदही महत्वाचे नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी मी केव्हाही वाकायला आणि झुकायला तयार आहे. 
  
मंत्रालय मिळाले तेव्हा चपराशीही नव्हता

हक्कांसाठी लढणे, ही आपल्यासाठी आजची गरज आहे. "झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहीये.", असे म्हणत त्यांनी ओबीसी बांधवांमध्ये जोश निर्माण केला. ओबीसी मंत्रालय तुमच्याच राज्यात झाले, ते बरे झाले कारण ते मंत्रालय तयार झाले म्हणून मला मिळाले. पण जेव्हा मिळाले तेव्हा तेथे चपराशीही नव्हता, तोही भाड्याने घ्यावा लागला, असे चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांना उद्देशून वडेट्टीवार म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख