नाशिकच्या अतिरिक्त SP शर्मिष्ठा यांची धडाकेबाज कारवाई : सांगलीकर म्हणाले सलाम तुमच्या कर्तृत्वाला - Sagli people congratulate Sharmishtha Walawalkar for Rev party action | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नाशिकच्या अतिरिक्त SP शर्मिष्ठा यांची धडाकेबाज कारवाई : सांगलीकर म्हणाले सलाम तुमच्या कर्तृत्वाला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 28 जून 2021

इगतपुरी येथील फार्महाऊसमध्ये मध्यरात्री सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात बिग बॅासशी संलग्न व अन्य चार अभिनेत्रींसह बावीस जणांना ताब्यात घेतली. या कारवाईचे नेतृत्व केलेल्या शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांचे विशेष कौतुक होत आहे. 

नाशिक : इगतपुरी येथील फार्महाऊसमध्ये मध्यरात्री सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. (Police take action against Midnight Hukka party at Igatpuri) त्यात बिग बॅासशी संलग्न व अन्य चार अभिनेत्रींसह बावीस जणांना ताब्यात घेतली. (22 Detain inclueding 4 Bllywood actress) या कारवाईचे नेतृत्व केलेल्या शर्मिष्ठा घारगे वालावलकर (DCP Sharmishtha Walawalkar) यांचे विशेष कौतुक होत आहे. सागंलीकरांकडून #आमचा अभिमान #नवदुर्गा #अभिमान सांगली या हॅशटॅगद्वारे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. 

शनिवारी मध्यरात्री अत्यंत नियोजनबद्ध कारवाईत पोलिसांनी बॅालिवूडमधील दोन कोरिओग्राफर, तमीळ आणि काही हिंदी चित्रपटांत भूमिका केलेल्या अभिनेत्रींसह बावीस जणांना हुक्का पार्टी सुरु असताना पकडले. त्यात मुंबईतून मादक पदार्थ पुरवठा करणारा एक नायजेरियन नागरिकह हाती लागला. या पार्टीत टाकलेल्या छाप्यातून मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे मुंबई लगतच्या भागात यापूर्वीही मादक पदार्थ विक्रेत्यांच्या रॅकेटकडून अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन होत आले आहे. त्यात आता नाशिकचा समावेष झाला हे अधिक धक्कादायक आहे. 

यानिमित्ताने सांगलीच्या नागिरकांनी हॅशटॅगद्वारे कारवाईत आघाडीवर असलेल्या श्रीमती वालावलकर यांचे विविध हॅशटॅगद्वारे कौतुक केले आहे. त्यात म्हटले आहे, पुन्हा एकदा आपल्या सांगलीच्या कन्या शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी मोठ्या रेव्ह पार्टीचा छडा त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लावला. काही वर्षांपूर्वी सांगलीच्याच विश्वास नांगरे पाटील यांनी रेव्ह पार्टी वर केलेल्या कारवाईच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यानंतरची हीच सर्वांत मोठी कारवाई असेल, असे त्यात म्हटले आहे. 

यावेळी महिला व पुरूष मादक द्रव्यासह नको त्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले. इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीत स्काय ताज विला या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला होता. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि DYSP अर्जुन भोसले यांनी टीमसोबत धाड टाकली. 

सोलापूरकरांनी केली बदली रद्द!
यापूर्वी त्या सोलापूरला सहाय्यक पोलिस आयुक्त होत्या. त्यांच्याकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या आल्या त्यात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय व त्याला कृतीची जोड यातून सोलापूरकरांत त्या एव्हढ्या लोकप्रिय झाल्या की त्यांची बदली झाल्यावर नागरिकांनी त्याला विरोध करत प्रशासनाला बदली रद्द करण्यास भाग पाडले. यावेळी ओरिसाहून मानवी तस्करीसाठी ओरिसाहून अकरा अल्पवयीन मुली मुंबईला नेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून त्यांनी त्याच्या मुळाशी जात त्या मुलींची सुटका केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुख म्हणनू काम करतांना बांधकाम व्यावसायिकाकंडून नागिरकांच्या पसवणुकीची अनेक प्रकरणे तडीस नेत तीस कोटी रुपये परत मिळवून दिले. जुनी मील प्रकरणात एका मोठ्या बिल्डरला अटक करून फ्लॅट बुक केलेल्या नागिरकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. हा बिल्डर त्यांच्या कारवाईमुळे नऊ महिने जामीन न मिळता तुरुंगात होता.   

आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कुटुंबियांच्या विरोधात त्यांनी मोहिम उघडली. त्यात साम-दाम -दंड-भेद नितीचा वापर करत त्यांनी ज्येष्ठांना त्यांच्या कुटुंबात मानाचे स्थान मिळवून दिले. अशा अनेक कारवाई व चाकोरीबाहेरच्या उपक्रमांमुळे त्या नेहेमीच चर्चेत राहिल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख