प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीच्या महिला मुका मार देखील देतात!
Bhamre-Darekar

प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीच्या महिला मुका मार देखील देतात!

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मुके घेणारा पक्ष अशी टिका केली आहे. यावरून श्री. दरेकर यांची पातळी कळते. मात्र त्यांनी लक्षात ठेवावे, आमचा पक्ष मुके घेणारा नव्हे तर वेळप्रसंगी मुका मार देणारा पक्ष आहे.

नाशिक : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) मुके घेणारा पक्ष अशी टिका केली आहे. यावरून श्री. दरेकर यांची पातळी कळते. (It shows his lavle) मात्र त्यांनी लक्षात ठेवावे, आमचा पक्ष मुके घेणारा नव्हे तर वेळप्रसंगी मुका मार देणारा पक्ष आहे. (Occasionally our party gives Invisible punch also) त्यामुळे यापुढे वक्तव्य करताना त्यांनी हे लक्षात ठेवावे, असा इशारा नासिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी दिला आहे. 
 
यासंदर्भात त्या म्हणाल्या, श्री. दरेकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी आपल्या पदाच्या मर्यादा ओळखून वर्तन व वक्तव्य करायला हवे होते. मात्र सदैव महाविकास आगाडी सरकारच्या द्वेषाच्या  राजकारणात बुडालेल्या भाजप व त्यांच्या नेत्यांना सध्या काहीही झाले तरी त्यावर टिका करण्याची संधी आहे असेच वाटते. या ओघातच त्यांनी अशी अशोभनीय टिका केली असावी. 

अशी टिका करणाऱ्या विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लक्षात ठेवावे की, समाज, महिला व जनतेच्या हिताच्या विरोधात काही घडत असेल तर वेळप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुका मार देणारा पक्ष आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रामोशी समाजाच्या मेळाव्यात प्रविण दरेकरांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशावर टिका केली. त्यात त्यांनी भाजपाची महिलांविषयी असलेली प्रतिमा काय आहे हे निश्चित होते. खरे तर विधान परिषद वरिष्ठ हे सभागृह आहे. मात्र भाजपने यात निवडणुकीत निवडून न आलेल्या कनिष्ठ विचारांच्या दरेकरांना संधी दिलेली आहे. 

यापूर्वीही भाजपच्या अनेक नेत्यांनी महिलांविषयी अतिशय हीन दर्जाचे शब्द वापरले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत दरेकर यांच्यासारख्या विचारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या लोकप्रतिनिधींची लाज वाटावी अशी स्थिती आहे. तुमच्या आठवणीसाठी मागील काळात एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. ते पाहून आता तुम्हीच ठरवा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष भाजप आहे की अन्य कोण. 

राष्ट्रवादी महिला काँग्रेस ची मागणी आहे की, महिलांविषयी आपल्या मुखातून लज्जा येईल असे शब्द आपण वापरले. किमान आपल्याही घरात महिला भगिनी आहेत. याचा विचार करून विवेक बुद्धीने महिलांची माफी मागावी. अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

...

हेही वाचा...


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in