प्रवीण दरेकर माफी मागा; अन्यथा रोज घरी पत्र पाठवू 

भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरूर (पुणे) येथील एका मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेससह महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी श्री. दरेकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर काळे फासू.
प्रवीण दरेकर माफी मागा; अन्यथा रोज घरी पत्र पाठवू 
Darekar NCP


धुळे : भाजपचे (BJP leader)नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिरूर (पुणे) येथील एका मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP Womens) महिलांबाबत आक्षेपार्ह (Indecent statement) विधान केले. या प्रकरणी श्री. दरेकर यांनी जाहीर माफी मागावी, (He shall apologize) अन्यथा त्यांना जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर काळे फासू, तसेच माफी मागेपर्यंत रोज त्यांच्या निवासस्थानी तार (टेलिग्राम) किंवा टपालाने निषेधाचे पत्र पाठवू, (Till then will send telegram or letter to his home) असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या येथील जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, (Jyoti Pawra) शहराध्यक्षा सरोज कदम (Saroj Kadam) व आंदोलकांनी दिला. 

येथील झाशीची राणी पुतळ्याजवळ मंगळवारी (ता. १४) दुपारी विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला आंदोलकांनी दरेकरांच्या प्रतिमेला जोडे मारो, शेण मारो आंदोलन केले. त्यात जिल्हाध्यक्षा सौ. पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम, युवती जिल्हाध्यक्षा हिमानी वाघ, जिल्हा कार्याध्यक्षा मालती पाडवी, जिल्हा कार्याध्यक्षा संजीवनी पाटील, शहर कार्याध्यक्षा तरुणा पाटील, पक्षीय विधानसभेच्या धुळे तालुकाध्यक्षा माधुरी पाटील, जिल्हा सरचिटणीस सरोज पवार, युवती कार्याध्यक्षा चेतना पाटील, शारदा भामरे, रेखा सूर्यवंशी, वनिता गरुड व वर्षा सूर्यवंशी सहभागी झाल्या. 

या आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे, की श्री. दरेकर यांनी शिरूरमधील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व महिलांबद्दल जे आक्षेपार्ह विधान केले ते त्यांची व सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या भाजपची बौद्धिक दिवाळखोरी व बौद्धिक दारिद्र्य जगजाहीर करणारे आहे. बऱ्या बोलाने दरेकर यांनी महिलांसह राष्ट्रवादीची जाहीर माफी मागावी, अन्यथा ते धुळे जिल्हा दौऱ्यावर कधी आले, तर त्यांना काळे फासून रंगविल्याशिवाय राहणार नाही. सत्ता गेली, की कसे वैफल्य येते हेच भाजप आणि दरेकर यांच्या विधानावरून लक्षात येते.

या वैफल्यातून ताळतंत्र, पुरोगामी महाराष्ट्राला साजेसा सुसंस्कृतपणा सोडून आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखविताना महिला वर्गाचाही आदर त्यांना राखता येत नाही, असे दिसून येते. दरेकर यांच्या रूपाने त्यांच्या बेताल, आक्षेपार्ह विधानावरून भाजप जो वैचारिकता, सुसंस्कृतपणाचा आव आणतो तो बेगडी व दिखाव्यापुरताच आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे दरेकरांनी मनाची नाही, पण जनाची लाज राखून लवकर जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या निवासस्थानी रोज पोस्टातून तार (टेलिग्राम) किंवा टपालाने निषेधाची पत्रे पाठवत राहू.  
...
हेही वाचा...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in