शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांना अखेर अटक

शिक्षकांच्या वेतनाच्या नियमित मान्यतेसाठी आठ लाखांची लाच घेतलेल्याने कारवाई झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा वैशाली वीर- झनकर यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Vaishali Zankar
Vaishali Zankar

नाशिक : शिक्षकांच्या वेतनाच्या नियमित मान्यतेसाठी आठ लाखांची लाच घेतल्याने कारवाई (8 lacs bribe accepted through driver for Teachers approval) झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा वैशाली वीर- झनकर Vashali veer- Zankar) यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

यासंदर्भात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख पंजाबराव उगले यांनी सांगितले, त्या बेपत्ता झाल्यापासून आम्ही त्यांचा शोध घेत होतो. त्यासाठी आम्ही दोन पथके देखील तयार केली होती. सातत्याने घेतलेल्या मागोव्यानंतर त्या शहरातच एका ठिकाणी रहात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आमच्या पोलिसांनी त्यांना सकाळी ताब्यात घेतले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० ऑगस्टला डॉ. वीर-झनकर आणि इतर दोघांविरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला. जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर, वाहन चालक ज्ञानेश्‍वर येवले, राजेवाडी (ता. नाशिक) येथील प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते पथकाने यांना पकडले. त्यानंतर याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी श्रीमीत झनकर यांची सहा तास त्यांच्या कार्यालयातच चौकशी करण्यात आली. त्या महिला असल्याने त्यांना रात्री अटत करता येत नाही, असा दावा पोलिसांनी केला होता. त्याचा फायदा घेऊन त्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाल्या होत्या. 

यामुळे सापडल्या झनकर!
दरम्यान काल त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आज त्याची सुनावणी होणार होती. पोलिसांनी त्यांना फरारी घोषीत केले होते. त्यामुळे या जामीनच्या प्रक्रीयेत अडथळा येण्याची शक्यता होती. कायदेशीर तरतुदी विचारात घेता, त्यांना सुनावणीच्या वेळी हजर रहावे लागले असते. त्यात जामीन फेटाळल्यावर त्यांना अटक अटळ होती. कायदेशीर सल्लागारांच्या सल्ल्यानंतरच त्या पोलिसांना सापडल्या नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. 
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com