लाच घेतलेल्या वैशाली झनकर यांची स्थावर पाहून अधिकारी चक्रावले!

चालकामार्फत आठ लाखांची लाच घेणाऱ्याजिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीरयांच्या चौकशीत त्यांच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या मालमत्ता पपाहून अधिकारीही चक्रावल्याचे कळते.
Vaishali Zankar
Vaishali Zankar

नाशिक : चालकामार्फत आठ लाखांची लाच घेणाऱ्या (8 lacs bribe accepted through driver) जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर (Z.P. Education officer Vashali Zankar- veer) यांच्या चौकशीत त्यांच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता (Had 4 flats and various lands in nashik & Kalyan) असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या मालमत्ता पपाहून अधिकारीही चक्रावल्याचे कळते. 

दरम्यान प्राथमिक चौकशीत आढळलेली ही संपत्ती आहे. तपास सुरु असल्याने याहून अधिक मालमत्ता आढळू शकते. त्याचा सखोल तपास केला जात आहे. श्रीमती झनकर फरारी आहेत. मात्र त्यांच्या शोधासाठी आम्ही यंत्रणा कार्यरत केली आहे. काही पथके त्यांच्या तपासासाठी रवाना झाली आहेत, अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या ठाणे विभागाचे पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी `सरकारनामा`ला सांगितले. 

दरम्यान वैशाली झनकर-वीर या फरारी कशा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांना पोलिसांनी एव्हढी मोकळीक कशी दिली?.  त्यांना फरारी होण्याचा सल्ला देणारा सल्लागार कोण?. लाच घेतलेल्या संशयीताची पार्श्वभूमी व कौटुंबिक सदस्यांची इतिहास विचारात का घेण्यात आला नाही?. असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. त्यांना अटक करण्यासाठी फारसे प्रयत्न देखील होत नसल्याने लाच घेतल्यापासून हे प्रकरण हाय प्रोफाईल बनले आहे.

लाच घेतल्या प्रकरणी येथील भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमती झनकर-वीर, शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर येवले, जिल्हा परिषद शिक्षक पंकज देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

त्तपूर्वी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी लाच घेतल्यानंतर श्रीमती झनकर-वीर यांची त्यांच्या कार्यालयात सहा तास चौकशी केली होती. यावेळी त्यांना त्यांचे दीर यांच्या हमीपत्रावर सोडले होते. सकाळी पुन्हा हजर होण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यांनी या पथकाला गुंगारा दिला. 

यावेळी झालेल्या चौकशीत श्रीमती झनकर-वीर यांच्याकडे सिन्नर येथे ०.५७ आर अर्थात १ एकर १७ गुंठे, कल्याणला मिलींदनगर येथे ३१.७० आर., १०.८ आर., ४०.८० गुंठे (१ एकर), १३.१० आर., सिन्नर तालुक्यात ५६ आर (१ एकर १६ गुंठे), ३.४१ आर आणि २२.७० आर. अशी १२३.६४ आर जमीन आहे. याशिवाय नाशिक शहरात शिवाजीनगर, गुगापूररोड, मुरबाड, गंधारे (कल्याण) अशा चार सदनीका, होंडा सिटी कार आणि एक अॅक्टीव्हा स्कुटर अशी संपत्ती असल्याचे कळते. ही संपत्ती, तीचे विवरण आणि त्याचे सध्याचे बाजारमूल्य याचा अंदाज घेता तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही भोवळ आली. त्याची माहिती श्रीमती झनकर-वीर यांनी शासनाला कळविली आहे काय?. त्याची मालकी खुद्द श्रीमती झनकर-वीर यांची स्वकष्टार्जीत की अन्य कुठल्या मार्गाने आली याचा तपास घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. याची वास्तव माहिती तपास झाल्यावरच न्यायालयात सादर केली जाणार असल्याचे कळते. 
....   
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com