८ लाखांची लाच; शिक्षणाधिकारी वैशाली झनकरांचा पोलिसांना गुंगारा!

वाहनचालक व शिक्षकाच्या मदतीने शिक्षण संस्थेकडून आठ लाखांची लाच स्विकारण्याच्या प्रकरणातील वादग्रस्त शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र महिलांना रात्री अटक करु नये या नियमाचा लाभ घेत त्या पोलिसांना गुंगारा देत फरारी झाल्याने खळबळ उडाली.
Zankar
Zankar

नाशिक : वाहनचालक व शिक्षकाच्या मदतीने शिक्षण संस्थेकडून आठ लाखांची लाच स्विकारण्याच्या प्रकरणातील (8 lacs bribe accepted from  education trust case) वादग्रस्त शिक्षणाधिकारी वैशाली झनकर (Nashik Higher secondary education officer Dr vaishali Zankar vir) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र महिलांना रात्री अटक करु नये या नियमाचा लाभ घेत त्या पोलिसांना गुंगारा देत फरारी (Zankar take benifit of womens not to be arrested after sunset and abscond) झाल्याने खळबळ उडाली. 

दरम्यान या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल लाच घेताना ताब्यात घेतलेले वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते (रा. राजेवाडी,नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले. पथकाने लगेचच वैशाली वीर-झनकर यांच्या दालनात प्रवेश करून कारवाई केली. यावेळी सायंकाळी झाली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महिलांना अंधार पडल्यावर अटक करू नये असे निर्देश एका प्रकरणात दिले होते.

त्यामुळे पोलिस उपायुक्तांनी त्यांच्यासमवेत एक पोलिस शिपाई दिला. तसेच त्यांना सकाळी आठला भद्रकाली पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार सकाळी श्रीमीत झनकर पोलिस ठाण्यात आल्या. त्यानंतर न्यायालयात येण्याच्या सूचना दिल्यावर त्या न्यायालयात येते व वकिलांशी संपर्क करते असे सांगत निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दुपारी दोन्ही संशयितांना पोलिसांनी न्यायालयात हजर केली असता, श्रीमती वीर-झनकर आल्याच नाही. बराच वेल प्रतिक्षा केली. त्यांचा दुरध्वनी बंद होता. त्यांच्या कुटुंबियांकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १३ ऑगष्ट पर्यंत पोलिस कोठडीत रवाना केले. यामध्ये श्रीमीत वीर- झनकर यांनी पोलिसांना गुंगारा दिल्याचे स्पष्ट झाले. वादग्रस्त लाचखोर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर पसार झाल्या असल्याची खात्रीशीर माहिती समोर आल्यावर खळबळ उडाली. 

८ लाखांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर (Nashik Higher secondary education officer Dr vaishali Zankar vir) यांचा चालक आणि एक शिक्षकास ताब्यात घेतले होते. तब्बल आठ त्यास या दोघांची चौकशी रात्री सुरु होती. पहाटेला भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

दरम्यान, डॉ झनकर यांना सकाळी आठ वाजता भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र याठिकाणी त्या हजर झाल्या नाहीत. यानंतर दोघा संशयितांना पोलिसानी आज दुपारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळीही डॉ झनकर हजर राहिल्या नाहीत त्यामुळे त्या कुठेतरी पसार झाल्या आहेत.
....

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com